Hostel Life😙आणि Relationship💆‍♂️
       


           माझा मित्र सुशांत पाटील म्हणायचा...  "यार लाईफ मध्ये प्रत्येकाने एकदा तरी हॉस्टेल लाईफ जगावी..." नाना प्रकारचे नखरे करणारी मुले😜 भेटतात...  😎दंगा... 🤗मस्ती... पार्टी🍝 ऑन नाईट... 🍷कडवी बीयर... आणि लवर्🤦...etc... MPSC चा ग्रुप असल्याने ते काही नाही पहावयास भेटलं... पण singal 🙇असलेल्या प्रत्येक मुलांना देखील Relation मध्ये घेऊन  रात्र भर ढेकूण chatting करतांना इथं पाहिलं😇... अनेक Relationship निस्वार्थी आणि निशरिरी असतील.... पण ही Relationship मात्र स्वार्थी आणि फक्त शरीरी आहे...🤓
         काल रात्री तर त्यांनी हदच पार केली... आणि रात्री 12:40AM पासून सुरु केलेलं Chatting सकाळ पर्यंत सुरू होत🤒... Intercast relashionship असेल तर मला त्या लोकांचा खूप अभिमान वाटतो... पण ही ढेकूण मात्र कोणताही cast criteria folllow न करता 🅰️+, 🅱️+आणि 🅾️+   च्या आमच्या रक्ताचा पिट्टा पाडला☠️... या वर्षी ठरवलं होत आता दोन वेळा Bood Donate करायचं... प्रत्येक Relationship काही ना काही Compromise करायला लावते पण मला वाटलं न्हवत हे देखील Compromise करावं लागेल... 😭
           हा...🌅 पहाटे.... पाहुणे चार च्या दरम्यान एक ढेकूण तर माने जवळ चावत होता... I think morning 😘 असेल त्याची... तडकाफडकी उठलो त्याला पकडलं आणि म्हणालो काय चाललंय... हातातून निसटला आणि वर तोंड करून म्हणतो... "इश्क करना अगर खफा  है, तो सजा दो मुझे..."🚶‍♀️ प्रत्येकीला सजा दिल्या तर हॉस्टेल वर 800 ते 1000 "मस्तानी" रोज ढेकणांच्या रुपात देह टाकून बसलेल्या पहावंयास भेटतील..👯
        म्हणून आज dare to date with🗓️ ढेकूण plan केली आहे... आणि हमला कीटकनाशक औषध  आणलं💊 आहे... बेवफा झालेली relationship नकोय आज संपवायची आहे, त्यांना date वर औषध देऊन... का नाही देणार... कुणा एका सोबत प्रामाणिक नाही राहत... प्रत्येकाचं रक्त हवं...bloodअसो...
       पण एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं... " Hostel  ला admition देखील cast बघून झाल होत प्रामाणिक ढेकणानी कोणतीही cast न बघता मात्र relashionship ठेवली... हॉस्टेल लाईफ संपेल पण हे ढेकणाचे स्वार्थी आणि शरीरी प्रेम त्या प्रत्येक hostelmate का आयुषयभरासाठी खुणावत राहील... तस पाहिलं तर.. 14 जून हा आंतररष्ट्रीय रक्त दान दिवस हॉस्टेल च्या प्रत्येक विध्यार्थी च्या लाईफ मध्ये रोज येतो... Indian governent ने 2018  आंतररष्ट्रीय भरड धान्य वर्ष पाळा म्हणून टाकलेला प्रस्ताव UNO ने काही स्वीकारला नाही... मला तर वाटतं 2019 हे आंतररष्ट्रीय ढेकूण वर्ष🙄 घोषित करून त्या प्रत्येक बलिदानाला आणि त्या प्रत्येक LOVE STORY😘 Infact Donation ला आजरा-अमर करावं... अतिशोक्ती ने बोलतोय हा...😂🤣





Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2