Breakup नंतर...

        एक निरर्थक निराशाजनक वक्तव्य... ज्याला ना आरंभ आहे ना अंत... पण एक आहे ती भावना... हो पण ती देखील निरर्थक आणि काहीशी दुःखद...
          वक्तव्या आड आज उद्या खूप दिवस पालाटतील पण दिवसवाचून कधी मन नाही, खर तर निराश लेल मन कधीच पालटणार नाही...
          सुखाच्या प्रतिमेवर सावट पडावं आणि सुखाची सर देखील न उरावी अशी एक तर गोष्ट प्रत्येक life मध्ये येत असेल, कारण प्रत्येकाच्या लाईफ मध्ये अनेक problems येतातच... पण सावट पडलेली ती प्रत्येक प्रतिमा मागे वळून पाहताना मनात विचार येतो... किती वेळ गेला होता ही प्रतिमा तयार करण्यासाठी... किती मेहनत घेतली होती यात रंग भरण्यासाठी... 
         काळाच्या ओघात रंग जरी फिके पडले असले तरी प्रतीमेखाली असलेलं ते नाव,  हो ते त्या प्रतीमेखालील दोघांचं तेच नाव जे आज जळबटलेलआहे ...पुन्हा  त्या दिवसांची आठवण करून निरास आणि भकास झालेल्या कल्पनेने विरून गेलेल्या त्याच वाटेवर पुन्हा जा... या साठी प्रेरित करत ... पण मन आहे ते, बहिणाबाई नी अगदी अचूक हेरले त्याला... म्हणे ,मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकल हाकल तरी येत पिकावर... पण मनाच्या या कप्प्यात आज काय वेगळाच विचार आला आणि त्या शेताची विसर पाडून त्या बहिणाबाईंनी देखील खोटं ठरवलं त्यानं... त्यांचं ते वक्तव्य त्यांचं ते बोल आज खरंच खोटं ठरवलं त्याने... आणि पुन्हा घेतला एक नवीन विहार त्याच कल्पना विश्वात आणि केला पुन्हा एकदा नवीन चित्र रेखाटण्याचा प्रवास... मग कुणाच्याहि साथी विना दुबळ्या झालेल्या त्याच हातांनी सावरत स्वतःला सावकाश का होईना पण रंग भरत... ना खुणावता... ना डीवचता... शांतपणे ... खूप प्रयास केला 6 महिने एका नवीन चित्रासाठी पण किती नव्यानं काढलेले ते प्रत्येक चित्र पुन्हा त्याच भकासचित्रसारख उठत होतं...

              काट्यांनी बहरलेल्या फणसावर बोटांनी टिचकी मारून त्याला पिकाला घोषित करून चवीनं खाता आल असतं पण प्रत्येक गरा माझ्या नशिबाने माझ्याच नशिबी लिहला  नसावा याचं कल्पनेने गर्याची चव चाखायची सोडून मी त्याच संरक्षण करत बसलो... त्यावर पाळत ठेवत बसलो... गरे माझे कोणी चोरून नेले नाहीत पण होत्या ठिकाणी ते फक्त माझ्या साठी कुजून मात्र बसले...
          आज ना त्या गर्याची अपेक्षा आहे ना त्या फणसाची... विरलेल्या त्या प्रत्येक फणसाच्या काट्यावर कपाळ घासून त्यात विलीन झालेलं माझं नशीब कुठं गवसत का शोधतो आहे... असच न समजणार आणि काही पुन्हा वाचून समजायला भाग पाडणार माझं हे वक्तव्य आहे...
त्या फणासाला मी तूर्ता विसरत आहे... त्याचं दिशेने जाणाऱ्या सर्व वाटा कुठं तरी कुंपित आहे समजणार नाही तुला तूर्तास हे, पण उमजेल नक्की वेळ निघून गेल्या वर आणि आहेस खर तर तू आता त्याच वेळेवर....


अभिजीत

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2