अधुरी भेट


       
      अधुरी भेट



ती येत होती तो जात होता
त्याला फोन थोडीशी खुलत होती
त्याला पाहून थोडीशी हसत होती
नजरेसमोर स्वप्ने घेऊन बसत होती...


पाहण्यासाठी तिला तो रोज लवकर येई
पण येता क्षणी त्याच्या अदृश्य होई
दिवसभर तळमळे तो तिच्या शोधात
रात रात भटके ती त्याच्या विचारात...


पहाटेपासून पळायचा तिच्याजवळ जाण्यासाठी
सांज होताना थांबायचा हुलकावणी घेण्यासाठी
खूप वाटायचे त्याला आज भेटू नदीकाठी
पण भेट तळायची पाहून तिच्या कपाळाच्या आठी...


दोघांनीही ठरवलं एकमेकांना भेटायचं
मनी जे आहे सर्व काही सांगायचं
एकमेकांना समजून आयुष्य जगायचं
पण ते अशक्य होत...


तो दिवस होता ती रात्र होती
तो सूर्य होता ती चांदणी होती
तो प्रकाश होता ती अंधार होती
तो मी होती अन् ती, ती होती...


✍️ Abhijeet Bhatale.
      Radhanagari.
      9764369098.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2