वीर जवान तुझे सलाम




       गेली चार-पाच दिवस माझा देश एका मोठ्या संकटाला... एका भीषण न संपणाऱ्या.. दुःखाला.. सामोरे गेला आहे... कारगिलमध्ये देखील एका दिवशी, जवान शहीद होण्याचा  आकडा नऊच्या वर नव्हता आणि आज पुलवामा मध्ये मात्र 44 चा आकडा गाठला आहे...😟
          खूप वाईट वाटतं, एखाद्याचं स्वप्न... एका सैनिकाचे घर... एक आईचा एकुलता एक मुलगा, एका बहिणीचा एक लाडका भाऊ, एका बापाचा आधार सगळच... सगळच एका दिवसात नाहीस होत... एका दिवसात सगळच नाहीस... मुलांचे शिक्षण... बहिणीचे लग्न... आई वडिलांचा आधार...एका मुलीचं सर्वस्व तिचा पती... सगळं निछांवर होऊन बसतं...☹️
         एका सैनिकाची खरी किंमत काय आहे ते आपल्याला समजण्यासाठी त्याला शहीद व्हावे लागत.. शहीद झाल्याशिवाय त्याची किंमत काय आहे ते आम्हाला समजतच नाहीत या पेक्षा वाईट काय असू शकते...., आणि मग नंतर ही लोकं सगळी ऊर पिटतात... अनेक जण फेसबुकचा डीपी व्हाट्सअप वर... हाईक... ब्लॉग... मेसेंजर... चॅट... गावात डिजिटल लावतात... आणि श्रद्धांजली वाहतात...😕
           मित्रां, माझा आक्षेप तुला नाहीये😖... पण माझा आक्षेप त्या प्रत्येकाला आहे,  जो फक्त शहीद झाल्यावर, तिथे सैनिकाला खरी किंमत देतो...
जो फक्त तीन-चार दिवस डीपी लावून नंतर सगळं विसरून जातो...
  👉 जो फक्त १५ ऑगस्टला २६ जानेवारीला सैनिका सोबत सेल्फी काढून स्वतःचीच पब्लिसिटी करतो...
  👉 माझा आक्षेप त्या प्रत्येक नेत्याला आहे, जो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मतांच्या भरभराटी साठी... तिथे भेट देतो.... भाषण करतो... रडतो...
  👉माझा आक्षेप त्या प्रत्येक कार्यकर्त्याला, समाज कर्त्याला आहे जो पंधरा दिवस सुट्टीवर आलेल्या सैनिकाला विचारत देखील नाही...
   👉 माझा आक्षेप प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला, सरपंचाला... तलाठ्याला आहे.. जो या सैनिकाला सामान्य माणसाप्रमाणे वागवत आहे... सही साठी थांबवत आहे...
   👉   माझा आक्षेप त्या प्रत्येक ट्रेन मधल्या प्रवाश्याला जो सैनिक सीट कन्फर्म नसल्यामुळे टॉयलेट शेजारी बसून गावी प्रवास करतो आणि एखादा सुशिक्षित प्रवासी सुद्धा त्याला बसण्याची जागा देत नाही...
        आजवर कधी वाचनात देखील नाही आल.. even कधी कुठं नाही पाहिल.. कधी कुठल्या पंचायत समितीत... ग्रामपंचायतीत वा तहसील ऑफिस मध्ये आपल्या गावात आपल्या तालुक्यात किती सैनिक आहेत याची कुठेच नोंद नाही... कधी 15 ऑगस्टला 26 जानेवारीला सैनिकाला आमंत्रण देखील नाही... सातवी नापास, पाचवी पास असणारे बंडलबाज पांढऱ्या पोशाखात झेंडा फडकवायला मात्र पुढे असतात ज्यांना झेंड्याचा सन्मान कसा करावा हे पण माहिती नसते... एवढेच काय तर त्याला झेंड्याची साधी गाठ  देखील मारता येत नाही... पण तिथं या सैनिकाला विचारलं देखील जात नाही... 50% लोकांना तर सी आर पी एफ चा लॉन्ग फॉर्म देखील माहिती नसेल, आणि त्याहून ही पुढे काही जणांना हे पण माहिती नसेल की आपल्या देशात कोणत्या कोणत्या paramililitary फोर्स आपल्या देशाची सुरक्षा करतात...
         वीर जवान शहीद झाल्यावर त्यांना थाटामाटात श्रद्धांजली सर्व जण देतात हे उत्तम संस्कार आहेत आपल्यावर....पण....
एक जवान वर्षातून फक्त पंधरा दिवस आणि 2 ते 3 वेळा सुट्टीवर येतो. त्यामध्ये त्याला आपल्या पूर्ण वर्षाची घरची कामे करायची असतात, आई-वडिलांचे आजारपण, मुलांची ऍडमिशन आणखी खूप काही करायचं असते.... पण हे नेते आणि सरकारी यंत्रणा त्यांना टाळत राहते हे एक कटू सत्य आहे, मग ह्याचा काय उपयोग तुमचा नुसता आलेला msg पुढे पाठवला की झाली दिली श्रद्धांजली...
       गावातील नेते जवानांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काय प्रयत्न करतात. त्यांना वाटते हा तर इथे फक्त सुट्टीवर आहे.  सैन्या मध्ये भरती झाला म्हणून त्याचा कधी  गावात सत्कार केला का ,कधी कोणत्या कार्यक्रमा साठी आमंत्रीत करता का..?? हे सगळ न बोलण्यामागे मागे एकच कारण आपल्या कार्यकर्त्याला कशाला दुखवायचे, मग त्यांचा जवळचा कार्यकर्ता चुकीचा असला तरी त्याची बाजू घेतात.आज संपूर्ण देशात नेते, अधिकारी, गावगुंड जे जवान बाहेर आहेत त्याच्या जमिनी संपादित करू इच्छितात, त्यांचा वापर करून घेतात.
आणि आशा या अवस्थेत कशाला पाहिजेत तुमच्या या पुळक्या श्रंधाजल्या...


       हे कटू असले तरी सत्य आहे.माफ करा वाईट वाटेल तुम्हाला.... पण खरच किती हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात त्यांना त्याची साधी कल्पना देखील आहे का आपल्याला.... इथे थंडी पडली की आपण पार गारठून जातो आणि तिथे मात्र त्यांची सकाळ दुपार संध्याकाळ त्या बर्फाच्या लाद्यावर अहोरात्र देशाच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून ड्युटी करतात... पुलवामा  मधे तर परवा -6° तापमान होत... राजस्थानमध्ये तर त्या वाळवंटात अंगाची लाही लाही होत असते त्यांच्या... छत्तीसगड मध्ये तर असे-असे जंगल आहे की सूर्याची किरणे सुद्धा खाली येत नाहीत, काही गावांची तर नकाशावर नोंद पण नाही आशा ठिकाणी आपले जवान लागतात 8-8 दिवस जंगलात operation ला असतात. ज्यांना सुट्टीवर येताना 30-30 किमी चालत येऊन मग गाडी मध्ये बसायला भेटते... आणि अशा या परिस्थितीत त्यांच्यावर फोर्स च्या स्ट्रिक्ट ऑर्डर्स असतात... त्यातही त्यांची शिस्त कायम टिकून असते...तरीदेखील देशाच्या संरक्षणासाठी कायम तो दटून असतो तिथे... त्यांच्या priorities आपल्या इतक्या शुल्लक... स्वार्थी... आणि स्वतःपुरत्याच नसतात...
मित्रांनो फक्त एका दिवसासाठी श्रद्धांजली आदरांजली नको... जेव्हा जेव्हा ते गाव येतील त्यांना जाऊन भेटू शकतो.. त्यांच्याशी हितगुज साधू शकतो त्यांची विचारपूस करू शकतो... त्यांचे त्यांचे अनुभव त्यांच्या सुखदुःख सगळ ऐकू शकतो... स्वतःच्या कुटुंबापासून.. आई वडिलान पासून.. घर-दार बायकापोरं पासून...दूर असल्याचं हे दुःख त्यांचं आपल्या जाण्यान कमी नाही होणार पण नक्की त्यांना आधार मिळेल... आणि त्यांना आश्वासन देऊ याप्रमाणे देशासाठी देशाचा आधार बनला त्याप्रमाणे आम्ही राहून आपल्या कुटुंबाला नक्की आधार देऊ..
                                                  जय हिंद 🇮🇳.
                                           ✍️ अभिजीत भाटळे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2