भारत नावच एक गाव भारत नावच एक गाव एक गाव असतं. खूप सुंदर. प्रगती करण्यासाठी धडपडणार. अनेक जातींचे अनेक धर्माचे लोक इथं गुण्या गोविंदाने राहत असतात. ना कुठली जाती भेद, ना गर्व, ना मत्सर, ना अहंकार... गावच्या राजकारणात कधी ही पार्टी, तर कधी ती पार्टी सत्तेत येत असते. काही दिवसांत मग हे पार्टी प्रमुख आपला पक्ष मोठा करण्यासाठी अनेक भाषणे करतात, नारे लावतात, जाती धर्मावर बोलतात, सहिष्णूता शब्दाला 'हॉर्स' लावून सगळ गाव विभागून टाकतात.. मग एके दिवशी होत अस, गावात अनेक वर्षानंतर सत्ताबदल होतो, आता 'हे ही दिवस बदलतील' असे नारे दिले जातात अन् तो सरपंच म्हणून निवडून येतो. सरपंच निवडून आल्यानंतर सगळ्या गावच्या आशा अन् आकांशा वाढत जातात, आता गावात अनेक बदल दिसतील, गाव स्वयंपूर्ण होईल, येथील लोकांना कामासाठी गावाबाहेर जावं नाही, रोजगार भेटेल, रोजंदारी मिळेल, बदल या शब्दावर विसंबून असणारे हे मोर दाटून आलेल्या या पावसाच्या सरी मध्ये पिसारा फुलवून नाचण्यासाठी आतुर असतात. ...
Nice abhi
ReplyDeleteआभारी आहे
ReplyDelete