"Happy Valentine Day... Singal असणाऱ्यांसाठी..."

         


गेली आठवडाभर विद्यापीठात म्हणजे आमच्या हॉस्टेल वर days चालू आहेत propose day... hug day... kiss day... blah blah blah... आंघोळीला पाणी न्यायला आल्यावर देखील झोप गेलेली नसताना ही एक मित्र दुसऱ्याला विचारतोय...अरे भावा... आज कुठला डे आहे...?? खरं तर उद्यापासून याचा शेवट होणार कारण आज valentine झाला की उद्यापासून असणारे days सेलिब्रेट करायला कोण जास्त तजवीज घेणार नाहीत...
            तर दुसरीकडे काल रात्री अकरा वाजता शिवजयंती ची पट्टी मागायला काही मित्र आले होते, यांना त्या वेलेंटाइन चे काही नाही even कुठलेही days च काही नाही... शिवभक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती जिवापाड प्रेम करणारे काही विद्यार्थी... त्यांचा देखील हा व्हॅलेंटाईनच आहे पण प्रेम मात्र शिवाजी महाराजांप्रति...  नाना प्रकारची इथ मुल आहेत... मला ही दुसऱ्या प्रकारची खूप आवडली... 

           असो, आपण वेलेंटाइन वरती आज बोलू... जी रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचे ठीक आहे व्हॅलेंटाईन साठी but रिलेशनशिपमध्ये नाही त्यांचं काय...?
हा....!  काही काही वेळेला, एक प्रश्न अनेक जणांना पडत असेल, प्रेम व्यक्त करण्यासाठी असणारा आजचा हा दिवस वर्षातून एकदाच येतो याच दिवशी प्रेम व्यक्त केलं तर बर.... नाहीतर मग करायचं की नाही... खूप मोठा आणि धाडसी निर्णय...

         आम्ही मित्र प्रेम व्यक्त करताना 1 एप्रिल मित्रांना सजेस्ट करायचो, कारण होय म्हंटली तर कुल... नाहीतर एप्रिल फूल... विषय मिटला...

           मला वाटतं...  आपण ना या दिवसा कडून देखील, खूप काही शिकण्यासारखे आहे... खरंच म्हणजे प्रेम व्यक्त करण्यासाठी असणारा दिवस... भारी concept आहे... पण आपण खूप मर्यादित विचार करून... या अमर्यादित concept ला खूप मर्यादित बंधनात जखडून ठेवलं आहे... बघा ना सोसायटीमध्ये अजून खूप काही लोक आहेत जी मॅजिक आहेत... आणि म्हणजे अशी royal आहेत... समजासाठी खूप काही करतात... बरं इतकं Broadly रहुदेत सरळ घ्या, आपले आई-वडील घ्या... कधीतरी... आजवर आईला एकदा प्रपोज केलं अहेक का कोणी...? आज खरंच करा... तिला म्हणा "आई मला तू खूप खूप खूप खूप आवडतेस... माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे... मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत..." मी तरी अजून एकदा पण नाही केला पण चांगली आयडिया आहे ना...? मला हे देखील माहिती कोणीच try नाही करणार पण एकदा मित्राला... आपल्या मैत्रिणीला...आपल्या भावाला... बहिणीला... किंवा तुम्हाला त्याच्याविषयी आदर करता त्यांना... त्याच्या कामाविषयी कर्तृत्वाविषयी किंवा एखाद्या दिग्गज नेतृत्वाविषयी.... मनात वाटत असलेल्या प्रेमाविषयी त्यांना सांगून टाका कारण याने एक होईल... नक्की होईल...काय सांगा...? हा प्रेमिका नसली तरी आपल्यावर प्रेम करणारी माणसं खूप भेटतील... आणि त्या माणसांकडून इतकं भरभरून प्रेम मिळेल की, कधीही प्रेमिका नसल्याचे दुःख भासणार नाही... आणि सिंगल असून देखील आपल्या इतकं खुश कोणीच असणार नाही... 😃😃😘

Love you all my friends

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2