कोल्हापूरच्या माणसाला शिवाजी राजे दिसले...

    



        काय करू महाराज.... काय करू तुम्ही सांगा...? तुम्ही शिवाजीराजे भोसले बोलत असलात...तरी आमच्यातल्या कोणी, सिनेमात काम करत नाही मग काय करू तुम्हीच सांगा...
       तुम्ही सिनेमातून सिनेमातून, सिरीयलमधून... वादळासारखे... अगदी वादळासारखे, येताहो आमच्या आयुष्यात... मग भारावून जातो आम्ही, फक्त तीन चार तासांसाठी...च... पण असली कित्येक वादळे आमच्या आयुष्यात दररोज घडतायेत... सवय झाली ओ वादळाची... सवय झालीये आम्हाला... मग... मग...त्रास होऊ लागतो, तुमच्या आचारांचा तुमच्या विचारांचा... आणि तुमच्या प्रत्येक शब्दाच्या....
          "शेतकर्याच्या मिरचीच्या देठालादेखील हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम करण्यात येतील...
गप्प बसा ओ त्रास होतो याचा .... त्रास , विसरावे लागत आहे हे सगळं... भूल द्यावी लागते स्वतःला... इंटरटेनमेंट शोधावी लागते.. फेसबूक ,व्हाट्सअप, हाईक, मेसेंजर, ट्विटर, ब्लॉग, ॲप, चॅट, सेक्स चॅट, लाईव्ह चॅट.. सिरीयल,  सिनेमा, काय म्हणे मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय... चार दिवस सासूचे... या गोजिरवाण्या घरात... आता बंद झालय आणि आलंय...आता नवीन... आलेल्या सिरीयल चला हवा येऊ द्या... राणादा...बाहुबली... आणि आमची पब्जी... किती... किती काय काय आहे नाही, स्वतःला बिझी ठेवायला
          मग...मग काय... मग प्रतिज्ञाच बदलते संविधानाची          भारत माझा देश... आहे??
      सारे भारतीय माझे बांधव.... आहेत??
       माझ्या देशावर माझे प्रेम.. आहे...??
     
           आणि महाराज तुम्ही वर  म्हणता कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला देखील भरल्यास साडी-चोळी सकट परत पाठवला... आ....ss.. गप्प बसा ओ... अहो सुनेच सोडा... परवा....परवा.... पर्वता त्या  नाशिक मध्येकिती 72 वर्षाच्या बत्तर माणसाने तेरा वर्षाच्या एका मुलीवरती ... शी.. बलात्कार केला.. ओ काय केला असता तुम्ही... सांगा ना महाराज... कडेलोट...हत्तीच्या पायी दिले असता... की शिरच्छेद केला असता.. आम्ही काय केलं माहिती आहे का पोक्सो कायदा आणलाया... Posco कायदा... या कायद्यान्वये बारा वर्षाखालील मुलीवरती जर बलात्कार झाला तर त्याला फाशीची शिक्षा दिली आणि बारा वर्षावरील झाला तर त्याला जन्मठेप किंवा दहा वर्षापर्यंत शिक्षा...
वयानुसार आम्ही एकाच गुन्ह्याला विभागून दिला महाराज.... आणि आम्ही गर्वाने सांगतो, महाराष्ट्र याची अंमलबजावणी करणारे राजस्थान मध्यप्रदेशनंतर तिसर राज्य आहे...
       महाराज... हे हिंदवी स्वराज्य व्हावे हिच श्रींची इच्छा... अस म्हणणाऱ्या, तुमच्याच.. तुमच्याच या या स्वराज्यात, कितीतरी सूना कितीतरी लेकिंची दशा त्या निर्भया वाणी होऊन बसलीय... ओ...मग सांगा..  मग काय करू तुम्हीच सांगा...
         महाराज खरचं बदलला आहे ओ तुमचा हा महाराष्ट्र... तुमचा वापर होतो तो फक्त निवडणुकीला आणि मतांच्या मागणीला... भाषणाच्या शीर्षकाला आणि मराठी माणसाला झाडावर चढवायला... बदलला आहे महाराष्ट्र नाही आज कोणी इथं
"वेडात मराठे वीर दौडले सात"
१.येसाजी बल्लाळ
२.दिपोजी राउतराव
३.विठ्ठल पिळाजी अत्रे
४.कृष्णाजी भास्कर
५. सिद्धि हिलाल
६. विठोजी शिंदे  आणि
७.प्रतापराव गुजर
आज इथं नाही कुणी भगव्यासाठी भांडणारे... झगडणारे.. पावनखिंडीत रक्त सांडणारे... झेंडे गाडणारे ....महाराज अहो खरचं...झेंडे देखील विभागले आहेत ओ...अनेक पक्षात... अनेक विचारत..अनेक संप्रदायात...पण बाकी एक खरं आहे तुमचा वापर तुमचं नाव त्या प्रत्येक झेंड्याखाली गर्वाने...अभिमानाने... स्वाभिमान जपत...घेतल जात... कश्याला माहीत आहे का..? मतांच मोल वाढवायला...
      महाराज तुम्हाला माहितीच असेल महाराज ज्याप्रमाणे तुमचं अष्टप्रधानमंडळ होतं ना त्याप्रमाणे तर संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी अमलात आलेल्या संविधान त्यावरच आपला देश चालतो महाराष्ट्र चालतं...
अनेक तरतुदी त्या संविधानात कलम 15 धर्म लिंग जात वंश भेद पाळली जाणार नाही..
कलम 16:- सार्वजनिक कामांमध्ये सर्वांना समान संधी
कलम 17:- अस्पृश्यत बंदी... कलम 44:- समान कामास समान वेतन आणि कलम 46:- अनु जाती अनु जमाती साठी शिक्षणाची तरतूद...
महाराज हे  फक्त संविधानात आहे हा... तुमच्या चेहऱ्यावर... तुमच्या चेहऱ्यावर हसू आलय... समाधान आलय... महाराज please... क्षणभंगुर आहे ओ हे... हे खरं नाही आहे... हे फक्त लिहिलेला आहे खरं तर इतर कायद्याला धाब्यावर बसवले आहे...!...
महाराज बाकी निवांत चालू आहे देश... एका आशेवर... फसव्या आणि खोट्या आश्वा शनावर मग काय करू तुम्ही सांगा...
महाराज इथे अनेक गुन्हेगार आहेत हजारो कायदे आहेत आणि त्याला लाखो पळवाटा आहेत... महाराज ज्या स्वराज्यासाठी तुम्ही तलवार उचललात ते मिळाले देखील... पण मानवल मात्र नाही, मग काय करू तुम्ही सांगा...
        कित्येक प्रश्न पडलेत उत्तर कोणाकडे मागु ते तरी सांगा... काय करू महाराज काय करू तुम्ही सांगा... काय करू महाराज काय करू तुम्हीच सांगा...???



                                                    ✍️अभिजीत भाटळे.
                                                          राधानगरी...
                                                          9764369098

Please comment if there anything wrong as well as if u like..☺️

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2