एक वेश्या...
  
            का आलायेस तू इथं.. का आला आहेस तू इथं.. या लाचारांच्या हिजड्या दूनयेत, काय काम काढलंस, की तू देखील शर्टाची चार बटणे खुली करून तुझी हावस भागवायला आलास, कुणाच्या तर उरावर पडायला,  तिचा भोग घ्यायला. खर सांग... "नाहीस ना तू यातील एक".  नाही काय आहे ना...? "इथं माणसं येत नाहीत"...! येतात ती फक्त जनावरे, आणि तुझ्यात कुठ तरी मला माणूस दिसला म्हणून तुला नाही, खरतर तुझ्यातील त्या माणसाला मी प्रश्न केला.. नाहीतर या असमाजमान्य धंद्यात आमची तोंड वर करून प्रश्न विचारायची लायकी नाही. अस काहींचं मत आहे.
आणि हो... ते आम्ही देखील मान्य केलंय... मान्य केलंय या देहान की तो पडेल त्या प्रतेकासाठी, त्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्यान माझ पोट भरू शकेल..

Abhijeet bhatale

सगळ जग एकत्र आल आणि ते काय तर ह्यूमन राइट्स म्हणून काय तर काढलं तेंव्हा वाटल खरंच आता आम्हाला देखील माणूस म्हणून जगता येणार... पण १९४८ पासून मी अजून पाहतेय कोणी आमच्यातील वेशीला कधी मिळालंय का यातील माणूसपण.. नाही रे... पंधरा वर्षांपूर्वी चाळीस हजार रुपयाला विकलेल्या या गुलामी देहान कशी अपेक्षा करायची .. मानवी हक्काची...
खर तर रेड लाईट  एरिया सोडला तर आम्हाला देखील समाजात मान हवा आणि त्याची आम्ही अपेक्षा करतो. पण अनेकांनी ढकलून दिलय आम्हाला या डोहात ज्याच्या पात्राचा विस्तार दिवसेंदिवस आम्ही जिथं जिथं जाऊ तिथं तिथं येत आहे... मग आम्ही देखील मान्य केलं या समाजाला त्यांच्या आमच्या विषयी असणाऱ्या कल्पनांना.. जो जो आमच्या कडे येतो ना तो खरंच विसरतो की ही बाई आहे.. किंवा ही देखील माणूस आहे.. त्याची हावस भागे तोवर तो शांत.. एकादासा झाला रिकामा की निघाला आपल तोंड बांधून पुन्हा तुमच्या दुणयेत.. स्वाभिमानाने अभिमानाने जगायला.. ताट.... मान वर करून... पण खरंच कुणाच्या तर जबरदस्ती मुळ आज आमच्यावर ही RMD आणि ही पानं.. ही गुटका खायची वेळ आलीय.. सवय नाही आम्हाला याची पण प्रत्येकाच्या तोंडात जायची इच्छा नाही होत... आणि कुणाचं तर प्रेम आल् तर ते चार ते पाच मिनिटं पुरतच येत ( थोडंसं हसत)

           आता तू म्हणशील मग का पत्करालीस हा मार्ग, माहित आहे ना..? या वाटेला किती काटे आहेत, तर बाबा, "तुझ्या आधी बरीच जन हे ईचारुन गेलीत खर आमचा मार्ग नाही बदलू शकलो आम्ही".. आणि काटे म्हणत असशिल तर आहेत, आहेत इथं अनेक दलाल, काटे... पण त्या काट्यांच्या जीवावर पोट भरतो म्हणायचं... भडव्याना पैसा हवाच... आणि यांच्याकडून आम्ही पैसे घ्यायचा नाही... यांचं देखील ओझ असत आमच्या छाताडावर... कीव आलाय या जगण्याच्या पण काय करणार.. लाचार नजरेने आज तू आमच्या कडे पाहत आहेस. कधी तर आम्ही देखील याच नजरेनं कुणाकडे तरी पाहत होतो समाजानं काय वेळ आणलिये नजर फक्त बदलली आणि तिला माझ रूप दिलंय...
         होय... अरे....  रुपावरच तर सगळ आहे आमचं... जोवर रूप आहे तोवर कोण तर आहे.. तिथं पण तुम्हाला choice हवाय... जरा वेळ बस इथं आणि बघ किती demads असतात. किती प्रश्न पडतात. चार पैसे दिलं की स्वतःच्या बापाचा माल समजू लागतो प्रत्येक जन.. होय माल... तीच लायकी राहिलीय आमची. माझ्या तोंडावर तुला हसू दिसलं. शृंगार दिसेल पण माझ आतड काय म्हणतंय तुला काय सांगू.. अरे या तोंडावर शृगार आणय साठी पण दर दोन तासात एक नवीन थर चढवतो आम्ही.. कुणी तर उतरवावा म्हणून.. फक्त थर चडवण्याच  उतरवण्याच समाधान. तुझ्या भाषेत make up...  तुमच्या आयुष्यात अनेक भिभस्त असतील प्रेम, भावना, विचार पण आमच्या आयुष्यात फक्त एक हावस, एक इच्छा आणि कुणाचं तर ओझ... इतकंच आहे... चार पैश्याच्या मोहन यात उतरले आणि आयुष्याची राख रांगोळी करून बसलेय... ना समाजात मान आहे ना ईज्जत... पण हा पोट भरतोय म्हणायचं माझ आणि माग दोन जण उरल्यात त्यांचं...  काल परवा कोण तर म्हणत होत आयुष्य खूप सुंदर आहे.. पण ते आयुष्य जगायला ही ती दुनिया नाहीच आहे.. इथं कोणी नाही म्हणणार इथं फक्त देहाचा व्यवहार... आणि बाजार चालतो.. बाजार.. आणि त्या बाजारातील मी माल आहे... तोवर ताजा आहे तोवर गिऱ्हाईक आहे... उद्या शीळा झाला तर कोण ढुंकून पण बघणार नाही, असा माल...
Abhijeet Bhatale

          तू जा बाबा या दूनायेतू खरंच जा तू इथून... हि दुनिया... ही दुनिया लय लय बेकार आहे नको वावरू या दुनयेत कोण तर चुर्रा करील तुझ्या भावनांचा..
खर हा... कधी तर ये आमच्या दूनीयेत फेरफटका मारायला कारण जंगली स्वापदमधे माणूस पहिला की बरं वाटतं... समाधान मिळत...

✍️Abhijeet Bhatale
     Shivaji University Kolhapur
     Bachelor of Library science
     9764369098
#prostitution
#vesha
#bookWritting

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2