गावाकडची गोष्ट.... भाग 2
गावाकडची गोष्ट.... पार्ट 2 आम्ही शाळेला असताना आमचा गणवेश फिक्स होता... खर तर तेंव्हा सर्व केंद्र शाळे अंतर्गत असणाऱ्या शाळेचा गणवेश खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट... आमच्या वर्गाचा CR पिंट्या होता.. पिंट्या म्हणजे जगदीश कवळेकर... सर याला तवा नाव लिहायला सांगायचे आणि आपली काम करायचे... तेंव्हा आम्हाला येरुडकर सर होते... लय म्हणजे लय भ्यायचाव आम्ही सरासनी... सरासनी राग आला की लाथा बुक्क्या मारायचे.. पण किती मारलं तरी कोणी घरातलं विचारायला मात्र जात न्हवत... सरांचा मार बघून काही जणांनी शाळा सोडली होती... पण आम्ही काही नग असे होतो... आरदांड.... आम्ही नऊ जण आमच्या वर्गात एक मुलगी पण नाही... चौथी चां आमचा पट नऊ जण फक्त... माझा हजेरी क्रमांक पाच होता... तवा वाटायचं की मी वर्गात पाच नंबर न हुशार हाय वाटत.. अंगणवाडी ला असताना सुकडी मिळायची... ताट भरून आम्ही छकड्यात बसून खायचो पण मोठं होत गेलो तस सूकडी बंद झाली... लहान पोरासानी गोड बोलून त्यांना आमिष दाखऊन त्यांच्या डब्यातील किती तरी वेळा सुक...
Comments
Post a Comment