गवतावरील मोती... नाती गोती...


        हल्ली कुणाचं का निरीक्षण करा... हा कोणीही असो मग तो... Male... Female... Young.... Or Old... प्रत्येकजण पळत आहे... कोण पैसा कमवण्यासाठी ... पैसा असलेले दवाखान्यात दाखल होण्यासाठी... नोकरी साठी... गाडी साठी... मग लग्नासाठी... ते ही झाल तर मग मुलगा होण्या साठी... सुख समृध्दी साठी... म्हणजे थोडक्यात प्रत्येकाच्या त्याच्या लाईफ मधे काही priorities असतील त्या प्रत्येक गोष्टी साठी...
           धावत असताना ती प्रत्येक गोष्ट म्हणजे जे काही त्याच aim आहे, ध्येय आहे... ते त्याला, गडद सकाळी... धुके पडून... सोनरी किरण पडलेल्या कुरनावानी वाटतं असत...  कुरणावर सूर्यकिरणे पडून तयार झालेल्या मोत्याची आरास नाहीशी करत त्यावर अलगद पाय टाकत चालायला पहिला पहिलाच खूप छान वाटतं...


         पण  काही मर्यादित वेळेसाठीच, प्रत्येक जन या कुरणात आपलं स्वतःचं अस्तित्व हरवून, एका नवीन जगात प्रवेश करत असतो... विद्यार्थ्यांचा विचार केला तर MPSC असेल, BANKING असेल, SSC वा कोणतीही स्पर्धा परीक्षा काही REGULAR SCORCE असतील Phd असेल वा अस म्हणू कोणतेही उच्च शिक्षण असो... जीवनाच्या शेवटच्या terning poing वर येऊन थांबलेली ही त्यांची गाडी...
          आणि विवाहित लोकांचा विचार केला तरी नव जोडप्या पैकी प्रत्येक जण यात बसेल... नवे घर... नवी स्वप्ने... दोघांनी स्वतःच्या स्वप्नाला घातलेल्या काही मर्यादा... नवी माणसे आणि त्यांच्या नव्या प्रवुत्या...  आणि बरच काही... खर तर नव विवाहित प्रत्येक स्त्री ला मी देशाच्या पंतप्रधान यांची उपमा देऊ करेन... एका दिवसात सत्तांतर होऊन सत्ता तिच्या हातात येत असते... काही टीका करणारे विरोधी पक्ष असतात... काही स्वतः च्याच पक्ष्यात फितूर झालेले लोक असतात... आणि चुकून जर घरातच विरोधी पक्ष नेता असेल तर देश चालवणं त्या PM ला खूप कठीण जाईल..
        असो काहीस विषयांतर होत आहे... पण प्रत्येक जण स्वतःला या कुरणात हरवून बसतो   अशा वेळी मग वाट हरवण्याची किंवा कधी तर त्या वाटेचीच नाळ तुटल्यासारख वाटू लागतं आणि प्रवासाची दिशा बदलू लागते... कोणत्याही पूर्वतयारी विना सुरू केलेला तो प्रवास मग कंटाळवाणा वाटू लागतो... आणि त्या गर्दीत आपण स्वतःलाच हरवून बसतो... न संपणारा हा प्रवास सोडायची कुणाचीच इच्छा नसते, असते ते फक्त वाट बदलण्याची इच्छा... आणि मग इथं सुरू होतात खर तर आयुष्यात problem... आणि प्रत्येक problems मध्ये आपण स्वतःला इतकं गुडफतून घेतो की आयुष्य मग जगणं कठीण होत... हिरवे गार... निरस... आणि हवं हवस वाटणारं ते कुरन मग भकास आणि नकोस वाटू लागतं... नको वाटू लागत ते भावनांनी भरलेलं विश्व... गवतावरील ते मोती... कुरणानी बहरलेली ती वाट... आणि ती स्वप्ने... आणि मग सुरू होतो आणखी एक प्रवास वाट नसलेल्या दिशेने...
         

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2