बक्षीस

आजच्याच दिवशी ची दहा वर्षां पूर्वीची गोष्ट, मी आठवीत होतो "आमदार शंकर धोंडी पाटील महाविद्यालय कंथेवाडी" शाळा नविन, मित्र, शिक्षक अन् सगळच नवीन.. काही जुन्या दोस्तांसोबत एका नवीन वातावरणात नवीन नियमांसोबत एक महिना भराचा आमचा प्रवास असेल... खूप नाव लौकिक ऐकुन या शाळेत घातले होते मामांनी...

Pic. Prasad D ingavale

       त्या दिवशी भाषण स्पर्धा होती, विषय होता "राजर्षी शाहू महाराज".. मात्र तेंव्हा काहीच माहीत न्हवत.. मी राधानगरी चां रहिवासी आहे, मग राधानगरी हे नाव त्यांच्यामुळे  "लक्ष्मी तलाव त्यांनी बांधले आहे आणि अस्वलाशी कुस्ती जिंकली होती एवढंच काही तर तोडका मोडका इतिहास माहिती...
      मग मी पुस्तके शोधायला सुरू केली.. आणि त्यांचा प्रवास समजून घेऊ लागलो ज्या गोष्टी आवडू लागल्या त्या कागदावर लिहून काढू लागलो.. अध्यक्ष महोदय आणि पूज्य गुरुजन वर्ग... पासून सुरावात केली भाषण लिहायला.. दोन दिवस सलग ते पाठ करत होतो...
        आमच्या शाळेच्या बाहेर मोठा व्हरांडा आहे, तिथं सगळ्यांना बसवलं होत.. मी जरा पुढचं बसलो होतो.. दोन तीन भाषण झालीत .... अडखळत.. बाचकत... काहींनी खिशातून चिठ्ठी काढून वाचूनच दाखवलीत.. आता मात्र माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते.. आता आपले नाव येणार मग जमेल का..? विसरणार नाही ना.? पोर हसतील काय आपल्याला.?? असेच विचार डोक्यात येत होते.. बाहेर बारीक पाऊस होता...  वातावरण थंड आणि मला मात्र घाम येत होता.. आयुष्यातील पाचव सहावं भाषण असेल नाहीतर गावी असलो की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी ला आहेच आपल...
    पण इथं मुले जास्त होती.. सगळी माझ्यासाठी नवीन होती.. या भाषणावर आपली ओळख निर्माण होणार होती.. तेवढ्यात एस एस पाटील सरांनी माझ नाव घेतलं.. मी उठून शर्ट नीट इन करत पुढे गेलो.. मागे बसलेले माझे काही मित्र मला तिथून हात करत होते सर म्हणाले "चालू कर बाळ"
 त्यांच्याकडून नजर फिरवत मी ठरवल कुणाकडे नाही बघायचं... मग मी भाषण सुरू केलं मधेच चारोळी.. काही गोष्टी आणि पोवाडाने शेवट केला.. भाषण संपवून व्यासपीठाची मी रजा घेतली... पडणाऱ्या टाळ्या सांगत होत्या की भाषण छान झाले आहे पण मला काही समजत न्हवत...
   मला माझ्या पूर्ण आयुष्यात याच दिवशी दहा वर्षापूर्वी 50 रुपये चे बक्षीस मिळाले होते.. चार पाच महिने ती नोट मी कंपास मधे जपून ठेवली होती.. राजर्षी शाहू महाराज हा माझ्या भाषणाचा विषय आणि माझे माझे त्या वेळीच भाषण आज देखील हुबेहूब आठवत...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती च्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Abhijeet Bhatale.
Radhanagari.
       

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावाकडची गोष्ट.... भाग 2

भारत नावच एक गाव

गावाकडच्या गोष्टी... भाग 4