भारत नावच एक गाव

भारत नावच एक गाव 

भारत नावच एक गाव 

एक गाव असतं. खूप सुंदर. प्रगती करण्यासाठी धडपडणार. अनेक जातींचे अनेक धर्माचे लोक इथं गुण्या गोविंदाने राहत असतात. ना कुठली जाती भेद, ना गर्व, ना मत्सर, ना अहंकार...

           गावच्या राजकारणात कधी ही पार्टी, तर कधी ती पार्टी सत्तेत येत असते. काही दिवसांत मग हे पार्टी प्रमुख आपला पक्ष मोठा करण्यासाठी अनेक भाषणे करतात, नारे लावतात, जाती धर्मावर बोलतात, सहिष्णूता शब्दाला 'हॉर्स' लावून सगळ गाव विभागून टाकतात.. 

          मग एके दिवशी होत अस, गावात अनेक वर्षानंतर सत्ताबदल होतो,  आता 'हे ही दिवस बदलतील' असे नारे दिले जातात अन् तो सरपंच म्हणून निवडून येतो. सरपंच निवडून आल्यानंतर  सगळ्या गावच्या आशा अन् आकांशा वाढत जातात, आता गावात अनेक बदल दिसतील, गाव स्वयंपूर्ण होईल, येथील लोकांना कामासाठी गावाबाहेर जावं नाही, रोजगार भेटेल, रोजंदारी मिळेल,  बदल या शब्दावर विसंबून असणारे हे मोर दाटून आलेल्या या पावसाच्या सरी मध्ये पिसारा फुलवून नाचण्यासाठी आतुर असतात. 

         सरपंच एक दिवस सर्व तराळ लोकांना बोलवतो अन् त्यांची एक मीटिंग घेतो. त्यांना सांगतो, " गावात काही साधवायच असेल तर माझ्या विरोधात कोणी साधवायचे नाही". 

बदलाच्या या पावसात भिजण्यासठी आलेले हे सर्व मोर आपल्या फुललेल्या पिसर्याची मोळी बांधून डाव्या हाताच्या बोटाला लागलेली शाई पुसत निराश होऊन  घरी जात होते.. आपल्या सरपंचाला शिव्या देत, का तर पाऊस पडला नाही म्हणून.. आता चुकी कोणाची सरपंचाची कि माजीसरपंचाची कि आम्हा मोरांची.. ‘

        अनेक दिवस वर्ष गेले आणि आजचा दिवस आला, गाव खुप पुढ गेल, त्याच नाव बारावाडीत झाल, सरपंच देखील प्रसिद्ध झाले, त्यांनी केलेल्या काही कर्तृत्वामुळे आणि नेमलेल्या काही तराळांमुळे. इतक्या वर्षात गावात एक गाय आणली जाते अन ती गाय पोसायची जबाबदारी संपूर्ण गावाच्या वतीने सरपंच घेतो, गायीच्या करमणुकीसाठी अन लोकांना आवडते म्हणून गाईच्या गळ्यात एक घंटी देखील बांधली जाते, गाय दुभती व्हावी म्हणून सर्व गाव एक एक रुपये कर देखील देत होत सरपंचाना. अचानक शेजारच्या गावावर संकट येत अन मानस आपोआप मरायला लागतात, गावातील काही जुनी जाणती माणस पुढ येतात अन सरपंचाला विनंती करतात त्या गावाशी सर्व संबध तोडण्याचे पण सरपंच मात्र एक गल्लीतल्या राजकारणात व्यस्त असतो आणि त्या कडे दुर्लक्ष करतो, तो रोग देखील या गावात पसरतो गावाचा विकास थांबतो, गावातील सर्व लोकांना तोटा होतो आहे , अस तराळ साधवायला लागतात पण सरपंचाच्या मर्जीतील काही लोक मात्र श्रीमंत अधिक श्रीमंत होत होते. अन गाव मात्र गरीब गरीब होत होते. (मग हे श्रीमत होणारे लोक गावाला अप्रत्यक्ष लुटत आहेत का...?) असो आपन त्याविषयावर बोलू नये, कारण हे लोक सरपंचाच्या मर्जीतील आहेत.. आपण फक्त त्या गायीवर बोलू जिला पोसायची जबाबदारी संपूर्ण गावाची होती, चार चोर येतात आणि त्या गाईला चोरून घेऊन जातात.. तराळ आणि सर्व गाव त्या गाईच्या मागे.. चोर मात्र अति हुशार.

जेव्हा ते गाय चोरतात तेव्हा सर्वप्रथम गाईच्या गळ्यातील घंटा काढतात.

त्यानंतर त्यातील एक चोर गाव शिवाराच्या पश्चिम दिशेत घंटा वाजवत पळत सुटतो आणि बाकीचे चोर गाईसह पूर्व दिशेत पळत सुटतात.

गावातील रहिवाशी आणि तराळ घंटेच्या आवाजाला ऐकून पश्चिम दिशेकडे पळत सुटतात आणि चोर थोडे पुढे जाऊन मधल्या वाटेवरच घंटा फेकून पळून जातो.

त्यामुळे गावक-यांच्या हाती फक्त घंटाच लागते आणि चोर गाय चोरुन निघून जातात.  आता इतके वर्ष पोसलेली गाय गेली त्याच कुणालाच काय नाही तराळ मात्र घंटा गावली म्हणून गावभर साधवत आहेत..


गाय :- कोरोना व्यवस्थापन, शिक्षण, रोजगार, आरोग्य व्यवस्था,  महिला सुरक्षा,  महागाई ,परिवहन व्यवस्था, रस्ते, उद्योग व विकास, शाश्वत विकास, दारिद्य्र खूप काही आपल्या देशात ज्या वर आपण चर्चा देखील करत नाही, जे आणि जेवढ दाखवत आहेत तेवढच बघत आहोत  ( गाईची गोष्ट   what's app वरील Forwarded आहे ) 


घंटा :  सुशांतसिंग, रिया चक्रवर्ती, कंगना राणावत आणि अश्या इतर बातम्या 


तराळ : मिडिया 

सरपंच : सरकार 

गाव : देश 


ब्लॉग लिहिण्यामागे कारण एवढच आहे, थोडा विचार करायला हवा देश कुठल्या दिशेला जात आहे 

अभिजित भाटळे. 

राधानगरी 9764369098

माझी पोस्ट शेअर कराय ला माझी ना नाही..


#india #corona #abhijeet #abhijeetbhatale #bhatale #virus #bharat #news #media #banmedia #paidnews #politics #sushantsingrajput #riyachakrabarti 




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावाकडची गोष्ट.... भाग 2

गावाकडच्या गोष्टी... भाग 4