पसायदान आणि सुख....



       सुख... ( एकपात्री नाटक)

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

(रेabhijeet bhatale


जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

abhijeetbhatale14@gmail.com

सुख... आहे का ओ.. थोड सुख...
सांगा ना... आहे का थोड सुख..
सांगा ना ओ...? आ... आ.. आहे का  थोड सुख... आज आज सगळ सगळ आहे माझ्याकडे फेसबूक, व्हॉट्स अप,  Hike, massnager,  Blog, chat सेक्स chat, live chat.... सगळ सगळ सगळ आहे... पण नाहीये ते फक्त सुख...
           मग कुठ जाऊ... नेमक कुठ शोधू त्याला... सगळ्या वाटा तुडवून झाल्या ओ.. सगळी भर शोधलं... वाण वाण हिंडलो सुख शोधत.. आणि इथं येऊन थांबलोय त्या ज्ञानियांच्या राज्याला एक प्रश्न विचारायला.. मग मान्य करून सगळ त्या वाट हरवलेल्या वळणावर पुन्हा नविन वाट, नवीन हात आणि नवीन स्वप्ने  स्वतःच स्वतःसाठी अनेक घालून बंधने , मनाला बांध घालत त्या स्वप्नातून जागं होत, एका नवीन सूर्योदयाची वाट पाहून त्या सूर्योदयाच्या कोवळ्या किरणात माझ्या भकास जीवनाच्या जून_जरबाट आठवणी पेटऊन देऊ इच्छितोय...



                हे द्यानियाच्या राजा मग तूच सांग...
"चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।"
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
कुठ....? कुठ...?  शोधू रे मी.. सांग ना कुठ शोधू...?  कुठ शोधू तुझ चेतना चिंतामणीच गाव.... सांग ना.... आणि तुझ चेतना चिंतामणी च गाव तरी आता कुठ उरलाय ते देखील आता हायब्रीड झालय.. हरवलं आहे सिमेंट काँक्रिट च्या जंगलात... आणि हो त्याला कल्पतरूंचे आरव नाही रे त्याला आणि लोखंडी गेट आहे... तिथं 8000 पगाराचा वॉचमन आहे...
त्याच्याजवळ जाऊन तंबाखूची पुडी मागू का र मी... आणि मिळताच क्षणी सुख मिळालं म्हणून जग जाहीर करून गाजावाजा करत ... हलगी घेऊन तराळ होऊन गाव भर नाचू का रे बाबा... तूच सांग ना...
तू मोठ्या गर्वांन लिहलस....
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

         तिन्ही लोकी.....? मग... मग मला का नाही गणालास त्या तिन्ही लोकांत...  का अस जगापासून वेगळं करून, जगाच्या विरोधात जायला भाग पाडलास...? हे राजा सांग ना का नाही गणलास मला त्यात...? माहित आहे मला तु निरुत्तर आहेस...! 

               जगापासून वेगळं करून मग त्या जगाशी लढण्याचं सामर्थ तरी का नाही दिलास मला..
काच खळग्यानी भरलेल्या या दुःखाच्या तीरावर किती वेळ त्या सुखाची वाट पाहू... की सोडून देऊन सारी बंधने... डावलून सर्वाच्या अपेक्षा झुकून देऊ स्वतःला त्या दुःखाचा डोहात... आणि संपऊन टाकू हा प्रवास.. नी हा श्वास... निदान ते तर सांग...?
         संपलीय रे माझी वाट पाहण्याची क्षमता तुझे "चंद्रमे जे अलांछन । मार्तंड देता पहीन"... आज तुझा "मर्तांडच"गुन्हेगार झालय.. आणि गुन्हा करून याच गर्दीत येऊन बसलाय... स्वतःला ओळखून देखील.. नजर वर करून नवीन गुन्हेगार शोधायला य... हे राजा बजाव तुझ्या या मार्तंड ला सांग त्याला... सरकार बदलल आहे कायद बदलेले आहेत. पण दिवस मात्र तेच बत्तर आणि आणि अनपेक्षित राहिले आहेत...! बजाव तुझ्या मार्तंड ला आणि सांग त्याला कुठल्या तरी पक्षाचा झेंडा घेऊन नाच म्हणा म्होरं.. तो झेंडा देखील विलीन होणार आहे एकाच झेंड्यात... आर तुझ्या या मार्तंड मुळे किती फुटिरतावाद वाढलंय इथं... कुणी तर पंधरा ऑगस्ट ला आणि 26 जानेवारीला या झेंड्याची आठवण काढत नाहीतर, स्वतचं स्वतःच्या गल्लीतल्या चुर्कुटका नेता करून मिरवत आहेत, स्वाभिमानाने अभिमान विसरून....!
         विसरली पूर्ती शिवाजी, संभाजी आणि शाहूंचा वसा आणि  वारसा... जिजाऊंचे संस्कार... आणि वेढात मराठे वीर दौडले सात म्हणून बजावून सांगतात आपली जात धर्म आणि गोत... विसरलात सगळी भारत माझा देश आहे आणि आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे... नाही पटत मग सांग ना...   सांग.... कोण होतीत.... मग कोण होती सांग... वेढात मराठी वीर दौडले...
येसाजी बल्लाळ
दिपोजी राऊतराव
विठ्ठल पिलाजी आत्रे
कृष्णाजी भास्कर
सिद्धी हिलाल
विठोजी शिंदे
प्रतापराव गुजर...
आ.....


प्रतापराव गुजर

विसरली पुरती ही ही माणसं... विसरलात सगळी ही माती...या मातीत केलेली क्रांती... या अभिमान.. आणि गर्व... विसरलात पूर्ती.. मला कश्याला जगू...? मग कश्याला जगू तुझ्या या असल्या "चेतना चिंतामणीच्या" गावात संपून टाकतो देहाची या रकरक... आणि आत्म्याला ठेवतो या जगभर भटकत.... बोलतेचे अर्णव पियुषांचे म्हणत,
काळोख होत चाललेल्या
अंधारी पडत असणाऱ्या
उत्तरअर्ध गाठू न इच्छिणाऱ्या
या माझ्या आयुष्याला
सत्कर्मी लाव...
हे विधत्या... हे ज्ञानेश्वरा... पाठव ते विमान जे तुकरायाना पाठवल होतास.. आणि लाभू दे रे मला परमार्थ... माझ्या आयुष्याला पूर्णविराम... मग म्हणेन रे मी गर्वाने....
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
          येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
          येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥


✍️ Abhijeet Bhatale 
      BLISc Shivaji university Kolhapur
      9764369098
      Trying different view to write this blog
      Really 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2