गावाकडची गोष्ट.... भाग 2


गावाकडची गोष्ट.... पार्ट 2


         आम्ही शाळेला असताना आमचा गणवेश फिक्स होता... खर तर तेंव्हा सर्व केंद्र शाळे अंतर्गत असणाऱ्या शाळेचा गणवेश खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट... आमच्या वर्गाचा CR पिंट्या होता.. पिंट्या म्हणजे जगदीश कवळेकर... सर याला तवा नाव लिहायला सांगायचे आणि आपली काम करायचे... तेंव्हा आम्हाला येरुडकर सर होते... लय म्हणजे लय भ्यायचाव आम्ही सरासनी... सरासनी राग आला की लाथा बुक्क्या मारायचे.. पण किती मारलं तरी कोणी घरातलं विचारायला मात्र जात न्हवत... सरांचा मार बघून काही जणांनी शाळा सोडली होती... पण आम्ही काही नग असे होतो... आरदांड.... आम्ही नऊ जण आमच्या वर्गात एक मुलगी पण नाही... चौथी चां आमचा पट नऊ जण फक्त... माझा हजेरी क्रमांक पाच होता... तवा वाटायचं की मी वर्गात पाच नंबर न हुशार हाय वाटत..
         अंगणवाडी ला असताना सुकडी मिळायची... ताट भरून आम्ही छकड्यात बसून खायचो पण मोठं होत गेलो तस सूकडी बंद झाली... लहान पोरासानी गोड बोलून त्यांना आमिष दाखऊन त्यांच्या डब्यातील किती तरी वेळा सुकडी खाल्लेली मला आजही आठवते.. सुकडी दे नाहीतर तू आमच्या डावात नाहीस.. वाळीत टाकणार तुला... ये... हेच्या बर कुणी बोलायच नाही रे.. अशी मज्जा... आता हसू येत स्वतःच स्वतःवर... पण काय बालपण ते... तेंव्हा हे सगळ माफ असणार...
         येरुडकर सर गेले आणि आणि आम्हाला मॅडम आल्या शिकवायला...
जायभाये मॅडम...
आमच्या गावात म्हणे या पहिल्या मॅडम होत्या... नाहीतर हीकडे हुड्यात कुणाला पाठवत न्हवती त.. आम्ही तीसरी ला होतो तेंव्हा... 
मॅडम म्हणाल्या उद्या शाळेत आत यायचं असेल तर इंग्लिश मधून विचारायचं...
लय म्हणजे लय मोठा प्रश्न निर्माण झाला..
गावात कुणाला काय येत नव्हतं..
त्यात ह्या म्हणत्यात इंग्लिश मधून विचारा...
दूध घालायला निघालेला भिका दादा आडसुळ मला खडीला दिसला..
तेची सायकल थांबवत मी त्याला म्हणालो
भिका दा "आत येऊ का"???
हेला इंग्लिश मधे म्हणायला येतंय काय तुला...
तो होता गडबडीत...
म्हणाला हो...
May I coming madam म्हणायचं...
        आता एवढं कुठ लक्षात राहतयं.. भिका दा कडून ते मी मराठी मधे "माय आय कमिंग मॅडम" अस लिहून घेतलं आणि पाठ करू लागलो... कुणाला सांगायला नाही मी मला बघायच होत... कोण कोण मार खातंय... अशी प्रवृत्ती तेंव्हा खूप होती... प्रवृत्ती कुठली कुचका पना... लय भारी वाटतंय कणी आपला अभ्यास पूर्ण आहे आणि आपण खाली बसलोय... आणि दुसरं कोण तर मार खात आहे...
लय म्हणजे लय भारी....
लहान असताना कुठ चौथी ला जाई तोवर आम्ही तीन मोठ्या समस्यांना सामोरे जात होतो..
पहिली तर शर्टाची बटण...
ती कधीच व्यवस्थित लागत न्हवती... वर खाली हे शंभर टक्के होणार... मग काय पुन्हा शर्ट व्यवस्थित लावायचा....
दुसरी मोठी समस्या म्हणजे... मला अजुन आठवत... आम्हाला सातवी तोवर तरी सगळ्यांसनी शिलपर असायचं... प्यारागान च पांढर शीलपर... ज्याचा खालचा भाग निळा असायाचा... तेंव्हा त्यात बोट कधी सरळ नसायाचीत... अंगठ्या च्या मधे ते चप्पल कधीच बसत न्हवत... किंवा क्वचितच... ही दुसरी समस्या... पण आज पण खूप भारी वाटत.. ते चप्पल... पावसाळ्यात त्याला मागे चीकल्या उडवत धुंगान पाक लाल भडक.... चीखलान...
आणि तिसरी समस्या तुम्ही प्रत्येकानं अनुभवली असेल... लहान पणी.. खाकी चड्डी.. पहिली बटणाची होती नंतर चीन असणारी रेडिमेड आली.. शिवल्या पेक्षा ती लय भारी दिसायची... सगळ्यांनी मग त्या चड्ड्या घेतल्या... खर... लय जणांची नुंनी मात्र त्यात अडकायची...
अहो.. हसताय काय...
खरंच... काय करणार...
सांगायचं कुणाला...
             कळ सोसलं तस... कळ सोसलं तशी... काडायची... नाहीतर... बाईंनो करून व्हा... करून रडायचं...
          खर तर आमचं खेळ विषय हार्ड होत... शाळेच्या मधल्या बेल मधे आम्ही... शिवाशिवी किंवा लंगडी खेळत न्हवताव.. आमच्या शाळेच्या साईड ला करवंदाच्या, घणेरीच्या जाळ्या... तिथं आम्ही गुहा करायचो... आत अस खेंडार काढायचं आणि वरण पाला टाकून झाकून घ्यायचो....
मग तवा शिवाजी महाराजांचा इतिहास... असच सगळ.. आमच्या वर्गातल्या सगळ्या पोरांच्या इतिहासाच्या पुस्तकात चित्रच न्हवती... सगळी गुहेत लावलेली... एकदा गावलाव हे बदया मारलं राव...
           तवा कुठला किंडर जॉय आणि कुठलं काय.. लाल बाबा मिळायचा... जे खाल की जीभ लाल व्हायची... आणि त्याचा कव्हर उलटा केला की माणूस... आणि सुलटा केला की बाई... हे बाई माणूस करण्यात दिवस दिवस.. मिलिंद दा सावंत च्या दारात... तवा गावात एकच दुकान त्यांचं... दुधी पेप्सी नाहीतर लाल बाबा.. मिळणं म्हणजे तवा नशीब.. कुणी पेप्सी घेतली की आम्ही तेच्या माग माग..
      आम्ही मित्रांची नाव घेताना पण लय मज्जा... तेज्या, सच्या, अम्या, विन्या, विशल्या, छत्र्या, महया ओंक्या... खर हे फक्त शाळेच्या मैदानावर... शाळेत किंवा गावात, पाठावर आणि लीदित... पण जर तेची मम्मी समोर असेल तर विशाल... तेजस... ओंकार अस म्हणायचं... एवढा कॉमन सेन्स तेंव्हा कुठून यायचं काय माहित....
       पण... दोन तीन वर्षां पूर्वी माझा यातील एक दोस्त... आमच्या  नऊ जनच्या ग्रुप मधील एक आमचा वर्गमित्र... शाळेच्या कॅटलॉग चां हजेरी क्रमांक चार... महेश चांदम आम्हाला सोडून गेला... आज देखील महेश ची आठवण येते.. गेट टुगेदर च प्लॅन घायलायला हा खूप पुढे... महेश गेला पण तेंव्हा पासून आम्ही कधीच गेट टुगेदर केलं नाही... 😥


Abhijeet Bhatale.
9764369098
Shivaji University Kolhapur
पोस्ट शेअर करायला माझी ना नाही...😄

Comments

  1. खूप खूप आभारी आहे

    ReplyDelete
  2. Kay tr name tak na post khali # krun ...mhnje post shear keli tri no problem

    ReplyDelete
  3. Abhya ya comments unknown mhnun ka pdtat🤔🤔🤔🤔urs PN

    ReplyDelete
  4. खर तर ब्लॉग आपल्यात कोण लिहीत नाही... आहे ब्लॉगर accont आहे जे गूगल किंवा gmail शी connect नसतं म्हणून unknown नावानं comment येते

    ReplyDelete
  5. सुकडी ची रेसिपी असेल तर पाठवा राव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari