गावाकडच्या गोष्टी... भाग 4


गावाकडच्या गोष्टी... भाग 4



     आमच्या गावात फक्त पावसाळ्यात शेती पण  उन्हाळ्यातला  मात्र रोजगार शोधावा लागत होता.. काही काही जणांचे वढ्याच्या बाजूला श्यात होत, त्यांच्यात हरभुरा लावयाचीत... आणि फिरून तवा दोन रुपयाला एक पेंडी विकायचीत... चीबड्यांची आज्जीच्या पाठी लागून आम्ही हराभुरा काढायला जायचाव... तिथं शेतात किती पण खा कोण ईचारत न्हवत... आणि आई ( आज्जी) पण लय माया करायची... विशल्या, भाऊ, राज, रणज्या, मी आमचा वैभव... सगळी जन हातातला डाव सोडून जायचाव... त्या साठी आई ला गोडी लावायला सगळी जन... हरभूर्‍याच्या हव्यासापोटी त्यांना खूप मस्का लावयचाव... हा ते प्रत्येकाच्या अंगात गुण असतात... आणि त्यांना पण ते निरागसपण खूप आवडायचं.. सगळ्यांना घेऊन मग खडीन खाली... शेताची वाट धरायची...( खर तर उत्तम कांबळे यांचं "आई समजून घेताना" हे पुस्तक त्यामध्ये दाखवलेली त्यांची आई आणि ही आमची आई यांच्यात थोडीफार भिन्नता बाकी सगळ सेम)  मग आम्ही आणि आमची टायर... हरबुरा खायला... जाईल तिकडे टायर फिक्स सोबत... सांजच्या पाहरान आम्ही वर गावात येणार... हातपाय धुवून... कट्टीवर बसून हरबऱ्याची घाट दातान कुरतुडून खाणार... काही काही जण लहान होती त्यांना सोलाता येत न्हवत मग त्यांना सोलून द्यायचं आणि त्याच्यातील पण दोन घाट मारायची... अर्चना वहिनी आणि गीता वहिनी नाहीतर कव्याका लय शिव्या द्यायची मग... त्यांनी अंगण पूर्ण लोटून काढलेलं असायचं... तवा सगळा रस्ता म्हणजे आपल अंगण वाटायचं.. हक्कान सगळी लोटायचीत.. रस्त्यावर शान पडल असल की लगेच उचलुन बाजूला ठेवायची..
        पण आता आपला पाय नाही ना जाणार, याची दक्षता घेऊन आम्ही पुढं जातो... हा एक छोटासा वाटणारा प्रसंग देखील खूप काही सांगून जातो नाही... यातून आपल गावाविषई प्रेम, आपुलकी दिसतेच की...
            पहिला कणी आमच्या घरात कोंबड्या होत्या... त्या कोंबड्या झाकायची जबाबदारी आम्हा भावा भावांवर असायची... मग शाळा सुटली की आम्ही त्याच जोडणीत... कोंबडी कुठ गेलीय हुडकायला.. दिसली नाही की, सगळ्या पोरासणी घेऊन... शोधमोहीम... तेंव्हा कुठ माहित नंतर येते ते... तिसरी चौथी ला असताना ओ... मग तो पण एक खेळ...
"हे बघ आमची घवरी उरपाटी कुठ दिसायला नाही" ( तिची पखं उलटी होती, आडसुलांची आज्जी तिला उरपाटी म्हनायची) तिला सगळ्यांनी शोधुया चला... CID ऑफिसर मग कामाला लागायचे आणि ठरलेलं असायचं कुणाला दिसली की देवळाजवळ येऊन गावली रे म्हणून वरडायच...
       एकदा असंच दारात कोंबड्या धरिताव.. मग खालन रंगू दां आडसुळ आलता.. हातात एक पिशवी  साधा पेहराव एकदम साधा आणि भारी माणूस.. सगळ्यांशी सलगिने घेणारा... रंगुदाने मला ईशाऱ्यान विचारलं कुठली म्हणून.. मग मी बोट दाखवल.. त्याला वाटलं कोंबडा... म्हणून त्यांनी पडकला... तर कोंबड्याची शेपटी हातात... आणि कोंबडा खापरीवर..पाक बुंडरा झाला... शेपच गेला त्याचा..रामदासच्या आज्जीने  धू धू धुतल आम्हाला... तिचा मुलगा रंगुदा मग आम्ही नावं सांगायच राहताव व्हय... आमची काय चूक नाही तुमच्या रंगुंदादा त्यांनी केलंय हे सगळ... अस आजीला गुर्मीत म्हणालो... खर भ्या होती मनात... कारण तवा दर दोन दिवसा ला मार बसायचा... आम्ही काय तर उचापती केलेल्या असायच्या...
         आमचा गणू आबा त्यांना आम्ही लय भ्यायचाव.. गणू आबा म्हणजे आमच्या गल्लीची शान होतत.. यांच्या तोंडात नेहमी खाऊच पान... माणूस काय असेल ते तोंडावर बोलणार... फटकळ स्वभावाचा.. पण अगदी फणसावानी... माया लय करायचा.. गल्ली पाक हादरून होती आबासनी... इजार आणि पायजमा यांचा पेहराव... खर कायम गळ्यात मोपरेल... आणि हातात सायकल... आबांनी तवा दारूच्या बाटल्या माग परड्यात, प्लास्टिकच टिक्क भरून ठेवल्या होत्या... आंग्रे मामा आईस क्रीम वाला आला, की आम्हाला काही सुचायच नाही ... मग आम्ही त्यातल्या दोन बाटल्या हळून काढणार .. चोरून आंग्रे मामा ला देऊन आईस क्रीम घेऊन गणू आबांच्या दारात बसून खाणार... पण काय.. टीक्क गेलं की तळाला... मम्मी आलती लाकडाला जाऊन... मोळी नुसतीच सोडत होती... याल काढलं आणि त्यानं चोपल होत... तवा पासून कुणाचं काय चोरल नाही... लय म्हणजे लय मारलं होत... पायावर वळ उट तवर...
इपराट...
            आमचा कणी कलिंगडाचा धंदा होता... सिजन मधे घरात झोपाय जागा नसायची दोन्ही सोप भरून कलिंगड... कलिंगडाचा टेंपो आला की सगळी गावातली पोर उतरायला... विशेषतः भरणकर यांच्या तील सगळी.. कलिंगड उतरायला घरला यायचीत... आमचा गाडा बी होता... नगरात गाडा लवयाचीत... ते इकायला... मग कलिंगड उतरताना जे फुटलं ते खायला मिळायच... म्हणून आम्ही डाव करून मुद्दाम कलिंगड हातातून सोडायचाव कुणाचं लक्ष नाही बगून हळूच टाकायचं... लहान पणी तुझ माझ काही नसतं, पैश्याच आमिष किंवा हेवा काहीच न्हवत... खायला कार आणि भुईला भार... अस होताव आम्ही.. खर तर ते सात्विक जीवन म्हणावं की काय माहित.. पण काही नको.... कसलीच अपेक्षा नसायची... गर्व नसायचा... लहान मोठं.. पैशेवांन गरीब आणि श्रीमंत ही दरी काही न्हवत.. ना कोणती स्वप्ने... ना काही इच्छा... ना कसला हेवा ... भारी होत जीवन.. पण भारी वाटत ते सगळ जगलेल.. अनुभवलेल... आठवायला... सांगायला... लिहून मांडायला... शब्द न जुळवत बसता... मुक्त पणे लिहायला... मान्य आहे जाऊ नाही शकणार आपण त्या दिवसात पुन्हा नव्यानं बागडायला... पण हृदयाच्या कप्प्यात अडकून राहिलेल्या तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या त्या आठवणींना त्या क्षणांना स्पर्श करू शकलो तरी बस झालं.......
          निशब्द...
Abhijeet Bhatale.
9764369098
Shivaji University Kolhapur
माझी पोस्ट शेअर करायला माझी ना नाही...😄

Comments

  1. अभिजित वेळ काढून तुझा ब्लॉगवरच्या काही पोस्ट/प्रसंग/कथा वाचल्या. छान लिहतोस. ओघवतं नि प्रामाणिक. गावाकडच्या गोष्टी खूप भावल्या...आजकाल संवेदनशीलता टिकवणं खूप कठीण आहे... आजूबाजूच्या खोट्या नि आभासी जगात ती तू टिकवली आहेस हे जास्त महत्वाचं!लिहीत राहा!! तुझ्या लिखाणाला...तुला हार्दिक शुभेच्छा!!☺️

    ReplyDelete
    Replies
    1. आभारी आहे madam आज वाचली आपली कमेंट खूप खूप भारी वाटलं आभारी आहे...

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2