Posts

Showing posts from 2019

गावाकडच्या गोष्टी... भाग 4

Image
गावाकडच्या गोष्टी... भाग 4      आमच्या गावात फक्त पावसाळ्यात शेती पण  उन्हाळ्यातला  मात्र रोजगार शोधावा लागत होता.. काही काही जणांचे वढ्याच्या बाजूला श्यात होत, त्यांच्यात हरभुरा लावयाचीत... आणि फिरून तवा दोन रुपयाला एक पेंडी विकायचीत... चीबड्यांची आज्जीच्या पाठी लागून आम्ही हराभुरा काढायला जायचाव... तिथं शेतात किती पण खा कोण ईचारत न्हवत... आणि आई ( आज्जी) पण लय माया करायची... विशल्या, भाऊ, राज, रणज्या, मी आमचा वैभव... सगळी जन हातातला डाव सोडून जायचाव... त्या साठी आई ला गोडी लावायला सगळी जन... हरभूर्‍याच्या हव्यासापोटी त्यांना खूप मस्का लावयचाव... हा ते प्रत्येकाच्या अंगात गुण असतात... आणि त्यांना पण ते निरागसपण खूप आवडायचं.. सगळ्यांना घेऊन मग खडीन खाली... शेताची वाट धरायची...( खर तर उत्तम कांबळे यांचं "आई समजून घेताना" हे पुस्तक त्यामध्ये दाखवलेली त्यांची आई आणि ही आमची आई यांच्यात थोडीफार भिन्नता बाकी सगळ सेम)  मग आम्ही आणि आमची टायर... हरबुरा खायला... जाईल तिकडे टायर फिक्स सोबत... सांजच्या पाहरान आम्ही वर गावात येणार... हातपाय धुवून... कट्टीवर बसून हरबऱ्याची घ

गावाकडच्या गोष्टी... भाग 3

Image
गावाकडच्या गोष्टी... भाग 3            लहान पणी आई बापाला कमी आणि आम्ही भुताला लय भ्यायचाव... आणि कुणी कुणी सांगून ठेवलं होत... तिथं जाऊ नगोस... मानवर बसल... पाटावर... लिदित.. एकट कुणी जाऊ नगोसा... बोंबड्यांच्या बाविकडे तर फिरकायच पण नाही... भुताच्या लय गोष्टी... आणि आम्ही अस सांगायचो जस की भूत आमच्या परड्यातच आहे.. पण एक गोष्ट नोटीस करण्या सारखी आहे ना... प्रत्येक गावात असा एक तर माणूस अस्तोय ज्यांन भुताशी कुस्ती तरी खेळलेली असती.. नाहीतर भूतान याच्या कडे तंबाखू तरी मागितला अस्तोया... मग याला आमचं गाव कस अपवाद आमच्यात बी होतीत अशी काही...            चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली आम्ही या गोष्टी ऐकायला बसायचं... त्या दिवसात गावात मदारी यायचे.. नंदीबैल वाले यायचे... कडकलक्ष्मी... आम्ही गाव भर यांच्या पाठ ने फिरायचा... असच तेंव्हा अस्वल देखील यायचं... आणि कुणी तर सांगितलं होत.. अस्वलाचं केस गळ्यात असल की भूत भित्यात... मग आम्ही आणवाणी त्या अस्वलाच्या मागंन... त्याची केस वडायला... कारण भूत लागा य नको म्हणून...         तवा आम्ही जेवणापाण्यानी खेळायचाव... तिथं पण लय मज्ज

गावाकडची गोष्ट.... भाग 2

Image
गावाकडची गोष्ट.... पार्ट 2          आम्ही शाळेला असताना आमचा गणवेश फिक्स होता... खर तर तेंव्हा सर्व केंद्र शाळे अंतर्गत असणाऱ्या शाळेचा गणवेश खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट... आमच्या वर्गाचा CR पिंट्या होता.. पिंट्या म्हणजे जगदीश कवळेकर... सर याला तवा नाव लिहायला सांगायचे आणि आपली काम करायचे... तेंव्हा आम्हाला येरुडकर सर होते... लय म्हणजे लय भ्यायचाव आम्ही सरासनी... सरासनी राग आला की लाथा बुक्क्या मारायचे.. पण किती मारलं तरी कोणी घरातलं विचारायला मात्र जात न्हवत... सरांचा मार बघून काही जणांनी शाळा सोडली होती... पण आम्ही काही नग असे होतो... आरदांड.... आम्ही नऊ जण आमच्या वर्गात एक मुलगी पण नाही... चौथी चां आमचा पट नऊ जण फक्त... माझा हजेरी क्रमांक पाच होता... तवा वाटायचं की मी वर्गात पाच नंबर न हुशार हाय वाटत..          अंगणवाडी ला असताना सुकडी मिळायची... ताट भरून आम्ही छकड्यात बसून खायचो पण मोठं होत गेलो तस सूकडी बंद झाली... लहान पोरासानी गोड बोलून त्यांना आमिष दाखऊन त्यांच्या डब्यातील किती तरी वेळा सुकडी खाल्लेली मला आजही आठवते.. सुकडी दे नाहीतर तू आमच्या डावात नाहीस.. वाळीत टाकण

गावाकडची गोष्ट...भाग 1

Image
गावाकडची गोष्ट...          आमचं बालपण हुड्यात गेलं.. हुडा म्हणजे राधानगरी च्या खुशितल ४० ते ५० घर असणार गाव... आज देखील गावात गेलं की, सगळ बालपण डोळ्यासमोर उभा राहत, दिवस बदलेल तस गाव देखील बदललं, आणि गावा सोबत गावातील माणस देखील...         असो, पण माझ्या लहान पणीची माणसं, ते चेहरे, तो रस्ता आणि ते जून दत्ताच मंदिर, सावरीच झाड, लदित जायची वाट, मेड्यातील आंबे, कड्याखाली जाऊन झालेली काटवनातील करवांद, बैलकरांच्या परड्यातील आळूच झाड, तिरफळे आणि सगळ्या गावात प्रसिद्ध अशी ललांडी.. ( त्या perticular आंब्याला आम्ही ललांडी म्हणायचो)... सच्या भरणकर ने शेंड्याला चडून काडलेली रतांबी, त्याचा कोवळी पान, रामदास आडसुळ ची आज्जी नसताना चोरून नेलेली चटणी मीठ आणि कच्या करवंदाचां केलेला आंबट ठेचा.. त्यावर लाल भडक चटणी आणि थोडंसं मीठ.. जराशी मिळाली असली तर साखर... आणि पाणी...  आमचं विन्या हे करण्यात पठाईत.. आडसुळांच्य परड्यातील बरका फणस...  वड्याच्या पल्याड जाऊन चोरून आणलेला ऊस, संदीप गावडे बरं जाऊन काढलेल्या काजी आणि बोंडू, सावरीच्या झाडाची फुल.. आणि घानेरीच्या काटीला खोचका ठेऊन केलेली गा
Image
                    एक वेश्या...                का आलायेस तू इथं.. का आला आहेस तू इथं.. या लाचारांच्या हिजड्या दूनयेत, काय काम काढलंस, की तू देखील शर्टाची चार बटणे खुली करून तुझी हावस भागवायला आलास, कुणाच्या तर उरावर पडायला,  तिचा भोग घ्यायला. खर सांग... "नाहीस ना तू यातील एक".  नाही काय आहे ना...? "इथं माणसं येत नाहीत"...! येतात ती फक्त जनावरे, आणि तुझ्यात कुठ तरी मला माणूस दिसला म्हणून तुला नाही, खरतर तुझ्यातील त्या माणसाला मी प्रश्न केला.. नाहीतर या असमाजमान्य धंद्यात आमची तोंड वर करून प्रश्न विचारायची लायकी नाही. अस काहींचं मत आहे. आणि हो... ते आम्ही देखील मान्य केलंय... मान्य केलंय या देहान की तो पडेल त्या प्रतेकासाठी, त्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्यान माझ पोट भरू शकेल.. Abhijeet bhatale सगळ जग एकत्र आल आणि ते काय तर ह्यूमन राइट्स म्हणून काय तर काढलं तेंव्हा वाटल खरंच आता आम्हाला देखील माणूस म्हणून जगता येणार... पण १९४८ पासून मी अजून पाहतेय कोणी आमच्यातील वेशीला कधी मिळालंय का यातील माणूसपण.. नाही रे... पंधरा वर्षांपूर्वी चाळीस हजार रुपयाला विकलेल
Image
                        कोल्हापूर  रात्रीचे एक वाजून चोवीस मिनिट झाले आहेत... आणि मी ही पोस्ट लिहीत आहे... अर्धवट झोपेतून जागा होऊन... अपरिपूर्ण झोपेत एक परिपूर्ण विचार मनात आला... हॉस्टेलच्या खिडकीतून बाहेर पाहताना जाणवलं,  एरवी झगमनार हे कोल्हापूर, किती शांत झालय... बघेल त्याच्या तोंडावर एकच वाक्य... अरे पाऊस कमी आहे का...? अजुन कुणाला काही मदत हविये का...? अरे भावा हॉस्टेल वर काही प्रॉब्लेम आहे का..?        स्वतःला या लोकांनी इतकं झोकून घेतलंय की, हे संकट प्रत्येकाला घरावर आल्या सारखं भासत आहे.. आणि खरंच आज याचा प्रत्यय आला.. कोल्हापूर गाव किंवा शहर नाही हे एक घर आहे... इथं जात किंवा धर्म नाही इथं माणुसकीचा वावर आहे .. इथला जावेद मुल्ला भाई मला मला म्हणतो.. एक वर्षी ईद वर कमी खर्च होईल पण अल्लाह देखील पाहिलं.. जावेद भाई नी 2 वेळा स्वतःच्या टेम्पो घेऊन जेवण आणून दिलं.. आज मशजिद मधे हिंदू आणि देवळात मुस्लिम ताटाला ताट लाऊन जेवताना एकाचं गोष्टीवर बोलतात.. येईल कमी पाऊस होईल पाहिल्यासारखं नीट... बसले पुन्हा घडी, तोवर सावरू एकमेकांना..          कोल्हा"पूर"

पसायदान आणि सुख....

Image
        सुख... ( एकपात्री नाटक) आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥ (रे abhijeet bhatale जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥ येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥ abhijeetbhatale14@gmail.com सुख... आहे का ओ.. थोड सुख... सांगा ना... आहे का थोड सुख.. सांगा ना ओ...? आ... आ.. आहे का  थोड सुख... आज आज सगळ सगळ आहे माझ्याकडे फेसबूक, व्हॉट्स अप,  Hike, massnager,  Blog, chat सेक्स chat, live chat.... सगळ सगळ सगळ आहे... पण नाहीये ते फक्त सुख...            मग कुठ जाऊ... नेमक कुठ शोधू त्याला... सगळ्या वाटा तुडवून झाल्या ओ.. सगळी भर शोधलं... वाण वाण हिंडलो सुख शोधत.. आणि इथं येऊन थांबलोय त्या ज्ञानियांच्या राज्याला एक प्रश्न विचारायला.. मग मान्य करून सगळ त्या वाट हरवलेल्या वळणावर पुन्हा नविन वाट, नवीन हात आणि नवीन स्वप्ने  स्वतःच स्वतःसाठी अनेक घालून बंधने , मनाला बांध घालत त्या स्वप्नातून जागं होत, एका नवीन सूर्योदया

Breakup written by Abhijeet Bhatale

Image
   Breakup     काल माझ्या एका फ्रेंड्स ब्रेकअप झालं, बिचारा खूप उदास होता, रडत होता... आणि मग स्वतःला सावरत देखील होता. परत स्वतःला काहीतरी कंडिशन घालून घेत म्हणायचा, बस झालं परत असल काही नाही करणार... परत कुणावर प्रेम नाही करणार... साला या सगळ्या मुली असल्याचं असतात...           तेंव्हा त्याला म्हणालो, मग वर्ष भर काय करत होतास... वर्षभर नाही का समजल... हे बघ "अंजाम ने दुःख दिया, वर्णा यादे तो प्यारी थी !" ठीक आहे ना, 1 वर्ष ची रिलेशनशिप, कमिटमेंट, किस्से, वादे.... सगळ सगळ सगळ ठीक आहे... वाईट वाटणार... त्रास होणार... सगळ जुन्या गोष्टी परत परत आठवणार... कॉल करावा वाटणार... सॉरी म्हणुन परत गाडी टपरीवर आणावी वाटणार... but, satisfaction जे हवं ते परत नाही भेटणार... उपकार कुणाचे ठेवायचे नाहीत... गेली ना.... गेली... परत नाही आता... Self Respect पहिला स्वतःला दे... मग जग बघ किती respect करत... आणि ती काय आजची उद्या येईल... मग अंगावर घ्यायची की, शिंगावर तेंव्हा ठरव... पण हे cold war आहे यातून पहिला सावर स्वतःला... मान्य आहे त्रास होईल पण कर सहन... खर  कॉल वा मॅसेज करू
Image
समाज माध्यमे आणि आपण...           परवा भीमा कोरेगाव येथील घटनेमुळे, एक दिवस समाज माध्यमे पूर्णपणे बंद ठेवण्यात आलीत. कारण मानवाच्या अमानवी प्रवृत्तीच रूप तिथं पाहायला मिळालं होत. समाज मध्यामाद्वारे येईल ती प्रत्येक गोष्ट फॉरवर्ड होत होती, कुणाच्या भावनादुखावल्या, मने संतापली, कुणाची घरे पेटली, काहींची डोकी फुटली, दंगे झाले, जाळपोळ केले, सार्वजनिक मालमत्ता बेचिराख झाली अनेक विचारांचे प्रवाह निर्माण झाले.            आणि मग अनेक विचारवंतांनी पेटलेल्या या विषयाच्या तळाशी जाऊन विचार केला आणि एक तथ्य समोर आले, या हाहाकाराला फक्त 'सोशल मीडिया' नावाचं दुधारी अस्त्र कारणीभूत आहे हे सिद्ध झाले.                 भारतीय राज्यघटनेने कलम एकोंनविस नुसार सहा स्वातंत्र्य प्रदान केली आहेत. त्यामध्ये एक म्हणजे विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. आपण आपले कोणतेही विचार निर्भिडपणे मांडू शकतो पण ते मांडत असताना, आपण त्याला असणारे अपवाद कुठ तर विसरतो. देशाची सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा, परराष्ट्र मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता व नैतिकता, न्यायालयाचा अवमान,

"Coffee with Tea" concept of Abhijeet bhatale

Image
                      Coffee with Tea           "Coffee with Tea" म्हणजे नेमकं काय आहे हे..? अभिजीत भाटले/ वैभव भाटले यांनी चालू केलेला "कॉफी विथ टी" हा एक ब्रँड आहे... ज्याचं नाव खूप विचार करून ठेवण्यात आले आहे. कॉफी म्हणजे मुलगी विथ टी म्हणजे मुलग्या सोबत अस छोटंसं combinataion आहे या नावाच्या मागे... अस हे गमक आहे "कॉफी विथ टी" या couple cafe चे   या नावाची publicity इतकी होत आहे की प्रत्येक couple ला आता झोंबड, झेंगाट, सैराट... अशी नाना नावे बदलून आता "COFFEE WITH TEA" हे  professional नाव वर येताना आज आपण पाहत आहे. आपल्या कॅफे मध्ये पिझ्झा, बर्गर, सँडविच तसेच हॉट/ कोल्ड अनेक कॉफी चे प्रकार पाहायला मिळतील So "Coffee with Tea" visit our cafe in following address RAJARAMPURI 8 LINE FROUNT SIDE OF LUCKEY BAZAAR NEAR CITI/ SHAHA HOSPITAL KOLHAPUR. Ph. 7030603233
Image
                            ओळख 👉🤵            जेंव्हा आपण जन्माला येतो, त्यादिवशी आपण या जगाला आणि हे जग आपल्याला अनोळखी असत, मग तिथून चालु "एक नवीन प्रवास" ओळखीच्या दिशेने. ज्याच्याशी ओळख होईल त्यांच्याशी मैत्री, मित्रत्व आणि अनोळखी लोकांशी ना मैत्री ना मित्रत्व... it's call it complicated story of relationship... Accord to me.. हा.... खरं तर त्या दिवसापासून जीवनामध्ये संपूर्ण जीवन जगे पर्यंत अनेक माणसांची ओळख आपल्याला होते काही चांगले , काही वाईट, काही हवसे आणि काही नको असणारे अनेक अनुभवांची शिदोरी ही ओळख आपल्या देऊन जाते... हव्या नको असणाऱ्या नात्यांच्या बंधनात आपल्याला अडकवते            मग अापण विचार करतो नको असलेल्या या नात्याकडे झुकायच की नाही... ओळखीची शिदोरी जपायची की, परत पाठवायची त्या माहेरवाशिणी पोरीवाणी... तात्पुरती पण आयुष्यभरासाठी... ओळख जपत... नको असणारे अनुभव, अटी आणि गाची आयुष्यात येतच असतात त्यांना सामोरे जाऊन जीवन जगण्यात खरी मज्जा आहे नाहीतर जगण्याला अर्थ काय..??😝🤔🤔 उपहासात्मक आहे पण खर आहे.                          

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

Image
गोष्ट प्रेमाची...            आठ  वर्षांपूर्वी ची गोष्ट. मी तेव्हां बारावीला होतो... नुकतंच नवीन कॉलेजात ॲडमिशन झालं होतं, किसनराव मोरे कॉलेज सरवडे...   कॉलेज खूप छान होतं पण तितकचं तिथं नियम आणि शिस्त यांचा बंधन खूप होत. पण, या नियम आणि शिस्त या बंधनातून मुक्त होऊन, जर कॉलेज विचार केला तर कॉलेज खूपच मस्त होत.       कधी वाटलं देखील नव्हतं की आपलं पहिलं प्रेम, पुन्हा नव्याने, याच कॉलेजमध्ये भेटेल आणि तेव्हा सातवीला असणाऱ्या माझ्या वर्गातील वर्गमैत्रीण,  'अंजली' पुन्हा कॉलेजमध्ये भेटली, पण पूर्ण बदलली होती. खव्याची बर्फी.. कच्चा मॅंगोची चॉकलेट किंवा चिंचेचा गोळा देऊन तिला इम्प्रेस करावे इतकी ती छोटी राहिली नव्हती. दोन वेण्या घालणारी, त्याला लाल रंगाची रिबीन बांधून तयार केलेलं, ते तिच्या वेनीच्या शेवटी असणार लाल फुल. मराठी शाळेचा तो निळा ड्रेस आणि पांढरा शर्ट असा असणार तिचा पेहराव. दोन्ही भुवयामध्ये अष्टगंधाची नाजूक टिकली जी तिच्या सौंदर्यात अधिकच भर पाडत होती. हातामध्ये हिरव्या बांगड्या... आणि डाव्या हाता मध्ये एक घड्याळ. पायामध्ये साजेस चप्पल कधी कधी सॅंडल, सतत

अधुरी भेट

Image
              अधुरी भेट ती येत होती तो जात होता त्याला फोन थोडीशी खुलत होती त्याला पाहून थोडीशी हसत होती नजरेसमोर स्वप्ने घेऊन बसत होती... पाहण्यासाठी तिला तो रोज लवकर येई पण येता क्षणी त्याच्या अदृश्य होई दिवसभर तळमळे तो तिच्या शोधात रात रात भटके ती त्याच्या विचारात... पहाटेपासून पळायचा तिच्याजवळ जाण्यासाठी सांज होताना थांबायचा हुलकावणी घेण्यासाठी खूप वाटायचे त्याला आज भेटू नदीकाठी पण भेट तळायची पाहून तिच्या कपाळाच्या आठी... दोघांनीही ठरवलं एकमेकांना भेटायचं मनी जे आहे सर्व काही सांगायचं एकमेकांना समजून आयुष्य जगायचं पण ते अशक्य होत... तो दिवस होता ती रात्र होती तो सूर्य होता ती चांदणी होती तो प्रकाश होता ती अंधार होती तो मी होती अन् ती, ती होती... ✍️ Abhijeet Bhatale.       Radhanagari.       9764369098.
Image
                विरह... आजवर ना कधी वाटले मज सोडून मजला विहार जमेल तुज...                        विरहाच्या नाजूक बंधनात                        अडकून मज,                        गेलीस निघून                        रंग ठेऊन आज... रंग तेच नव्यानं पाहतोय आज गेलाय तो दिवस तरी वाटतोय आज गेलाय तो दिवस तरी वाटतोय आज                ✍️ Abhijeet Bhatale.                      Journalism department.                      Shivaji university Kolhapur.                      Mob. 9764369098
Image
        कोल्हापूरच्या माणसाला शिवाजी राजे दिसले...              काय करू महाराज.... काय करू तुम्ही सांगा...? तुम्ही शिवाजीराजे भोसले बोलत असलात...तरी आमच्यातल्या कोणी, सिनेमात काम करत नाही मग काय करू तुम्हीच सांगा...        तुम्ही सिनेमातून सिनेमातून, सिरीयलमधून... वादळासारखे... अगदी वादळासारखे, येताहो आमच्या आयुष्यात... मग भारावून जातो आम्ही, फक्त तीन चार तासांसाठी...च... पण असली कित्येक वादळे आमच्या आयुष्यात दररोज घडतायेत... सवय झाली ओ वादळाची... सवय झालीये आम्हाला... मग... मग...त्रास होऊ लागतो, तुमच्या आचारांचा तुमच्या विचारांचा... आणि तुमच्या प्रत्येक शब्दाच्या....           "शेतकर्याच्या मिरचीच्या देठालादेखील हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम करण्यात येतील... गप्प बसा ओ त्रास होतो याचा .... त्रास , विसरावे लागत आहे हे सगळं... भूल द्यावी लागते स्वतःला... इंटरटेनमेंट शोधावी लागते.. फेसबूक ,व्हाट्सअप, हाईक, मेसेंजर, ट्विटर , ब्लॉग, ॲप, चॅट, सेक्स चॅट, लाईव्ह चॅट.. सिरीयल,  सिनेमा, काय म्हणे मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय... चार दिवस सासूचे... या गोजिरवाण
Image
                         वीर जवान तुझे सलाम        गेली चार-पाच दिवस माझा देश एका मोठ्या संकटाला... एका भीषण न संपणाऱ्या.. दुःखाला.. सामोरे गेला आहे... कारगिलमध्ये देखील एका दिवशी, जवान शहीद होण्याचा  आकडा नऊच्या वर नव्हता आणि आज पुलवामा मध्ये मात्र 44 चा आकडा गाठला आहे...😟           खूप वाईट वाटतं, एखाद्याचं स्वप्न... एका सैनिकाचे घर... एक आईचा एकुलता एक मुलगा, एका बहिणीचा एक लाडका भाऊ, एका बापाचा आधार सगळच... सगळच एका दिवसात नाहीस होत... एका दिवसात सगळच नाहीस... मुलांचे शिक्षण... बहिणीचे लग्न... आई वडिलांचा आधार...एका मुलीचं सर्वस्व तिचा पती... सगळं निछांवर होऊन बसतं...☹️          एका सैनिकाची खरी किंमत काय आहे ते आपल्याला समजण्यासाठी त्याला शहीद व्हावे लागत.. शहीद झाल्याशिवाय त्याची किंमत काय आहे ते आम्हाला समजतच नाहीत या पेक्षा वाईट काय असू शकते...., आणि मग नंतर ही लोकं सगळी ऊर पिटतात... अनेक जण फेसबुकचा डीपी व्हाट्सअप वर... हाईक... ब्लॉग... मेसेंजर... चॅट... गावात डिजिटल लावतात... आणि श्रद्धांजली वाहतात...😕            मित्रां, माझा आक्षेप तुला नाहीये 😖 ... प