गावाकडच्या गोष्टी... भाग 3


गावाकडच्या गोष्टी... भाग 3



           लहान पणी आई बापाला कमी आणि आम्ही भुताला लय भ्यायचाव... आणि कुणी कुणी सांगून ठेवलं होत... तिथं जाऊ नगोस... मानवर बसल... पाटावर... लिदित.. एकट कुणी जाऊ नगोसा... बोंबड्यांच्या बाविकडे तर फिरकायच पण नाही...
भुताच्या लय गोष्टी... आणि आम्ही अस सांगायचो जस की भूत आमच्या परड्यातच आहे.. पण एक गोष्ट नोटीस करण्या सारखी आहे ना... प्रत्येक गावात असा एक तर माणूस अस्तोय ज्यांन भुताशी कुस्ती तरी खेळलेली असती.. नाहीतर भूतान याच्या कडे तंबाखू तरी मागितला अस्तोया... मग याला आमचं गाव कस अपवाद आमच्यात बी होतीत अशी काही...

           चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली आम्ही या गोष्टी ऐकायला बसायचं... त्या दिवसात गावात मदारी यायचे.. नंदीबैल वाले यायचे... कडकलक्ष्मी... आम्ही गाव भर यांच्या पाठ ने फिरायचा... असच तेंव्हा अस्वल देखील यायचं... आणि कुणी तर सांगितलं होत.. अस्वलाचं केस गळ्यात असल की भूत भित्यात... मग आम्ही आणवाणी त्या अस्वलाच्या मागंन... त्याची केस वडायला... कारण भूत लागा य नको म्हणून...
        तवा आम्ही जेवणापाण्यानी खेळायचाव... तिथं पण लय मज्जा असायची... संजूदाच्या ट्रॅक्टर ची ट्रॉली देवळा बशी असली की सगळी आमची ग्यांग त्यात... स्वात्या अक्का आम्ही लीडर... ही सांगील ते सगळ आम्ही ऐकायचाव... निकिता... धनु... सुर्यादिप.. रामदास.. आशू.. सानिका.. गायत्री.. आंबरी.. छत्र्या.. किसती जन... मुली असल्या की काचकावड्या... जेवणापाणी... आटुक मटुक चवणे चतुक... लंगडी... जायभाये मॅडम नी गावात नवीन खेळ आणला होता आईच पत्र हरवलं ते मला सापडलं... आम्ही ते पत्र म्हणजे रुमाल घेऊन पळून जायचा व मग सगळ रिंगणात बसलेली मागणं पळत... आईच्या पत्राचा डाव कुठला.. हदकु माडकु सुरू व्हायचं...
          गल्लीतल्या सगळ्या पोरी एकत्र येऊन तेंव्हा आडसुळांच्या दारात हातका म्हणायच्या... आणि डब्यातून आणलेली खिरापत ओळखा... खिरापत ओळखली जात नाही तोवर डबा उघडला जाणार नाही अशी अट होती... आम्ही कट्टिवर बसून हताश्या सारखं त्यांच्या कडे बघायचो... कधी डबा उघडतो.. आणि कधी मला खिरापत मिळते... पण त्यांचं काय निराळाच.. खिरापत ज्या मुलीची ओळखत नाही तिला लय भारी वाटायचं... तेवढा भाव पण मिळायचा... तोवर हिकडं आमच्या तोंडाला पाणी... काय हाय म्हणून... सगळ झालं की छड्डीला हात पुसून खिरापत खायची .. आणि पुन्हा आपल्या आपल्या डावाला सुरवात...
   
           कुणाचा तर रिकामा छकडा येतेला दिसला की सगळी पळत जाऊन त्यात बसायचीत... मी एकदा चाकड्यातून पडलो आणि माझा हात मोडलेला... वाकलेला सप्पय.. घरात सांगितलं पायरी वरून पडलोय... खर अर्चना वहिनी नी बघितलेल तेनी घरात सगळ खर खर सांगितलं... मला लय वाईट मारलं होत... तवा...
          आमच्या शाळेला ला पटपडताळणी किंवा इन्फेक्शन असायचं... त्या दिवशी लय मज्जा असायची... सर सांगायचंत जी पोर येत नाहीत त्यासनी घेऊन या म्हणून... खर खोंड एक एकजण माळ्यावर... भाताच्या तट्ट्यात... न्हानीत... लपून बसायचीत... आम्ही आदव पाडून, मारून तंगड्या धरून उचलुन आणयाचाव... आणि सरांच्या बशी आणून ठेवायचाव... पोर बी लय बाद... शिव्या द्यायचीत... पण सरांची शाब्बासकी मिळायला सगळ वर्ज...
लहान पणी आमची संपती म्हणजे चीचुका... आणि गोट्या... तवा आठ आण्याला 10 चीचुक आणि रुपये ला चार गोट्या यायच्या... बाटल्या भरून ठेवायचा व आम्ही.. दप्तरात काय.. एक ताट... एक पाटी.. घाण झालेली काळी पडलेली घामानं पूर्ण काळी झालेली पेन्सिल.. आणि गोट्या आणि चीचूका... कुणी तर यातलं काय तर चोरल की मग "आच्ची कच्ची"...
       आणि कोण तर पादल की मग... आदल मधल कोण पादल... तवा लगेच नाव समोर यायचं... चोर लगेच सापडायचा.... अश्या काही भन्नाट आयडिया.. कल्पना तेंव्हा यायच्या...
        
Abhijeet Bhatale.
9764369098
Shivaji University Kolhapur
माझी पोस्ट शेअर करायला माझी ना नाही...😄


Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2