समाज माध्यमे आणि आपण...
      

   परवा भीमा कोरेगाव येथील घटनेमुळे, एक दिवस समाज माध्यमे पूर्णपणे बंद ठेवण्यात आलीत. कारण मानवाच्या अमानवी प्रवृत्तीच रूप तिथं पाहायला मिळालं होत. समाज मध्यामाद्वारे येईल ती प्रत्येक गोष्ट फॉरवर्ड होत होती, कुणाच्या भावनादुखावल्या, मने संतापली, कुणाची घरे पेटली, काहींची डोकी फुटली, दंगे झाले, जाळपोळ केले, सार्वजनिक मालमत्ता बेचिराख झाली अनेक विचारांचे प्रवाह निर्माण झाले. 

          आणि मग अनेक विचारवंतांनी पेटलेल्या या विषयाच्या तळाशी जाऊन विचार केला आणि एक तथ्य समोर आले, या हाहाकाराला फक्त 'सोशल मीडिया' नावाचं दुधारी अस्त्र कारणीभूत आहे हे सिद्ध झाले.     
           भारतीय राज्यघटनेने कलम एकोंनविस नुसार सहा स्वातंत्र्य प्रदान केली आहेत. त्यामध्ये एक म्हणजे विचार आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. आपण आपले कोणतेही विचार निर्भिडपणे मांडू शकतो पण ते मांडत असताना, आपण त्याला असणारे अपवाद कुठ तर विसरतो. देशाची सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा, परराष्ट्र मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता व नैतिकता, न्यायालयाचा अवमान, समाजामध्ये एकोपा टिकावा, जाती धर्मात तेढ निर्माण होऊ नये. या सर्व गोष्टीचा विचार मात्र आपण आपला विचार मांडताना कधीच करत नाही. आणि मग पुन्हा नवीन एका वादळाला आरोळी घालतो.  मग अस वादळ येत आणि निष्पाप लोकांवर निष्ठुर परिणाम करून जात.


          समाजामध्ये तेढ निर्माण करायला किती वेळ लागतो? पण यात होरपळणाऱ्या लोकांचा विचार केला तर काहीच पूर्ण आयुष्य पणाला लागत. मग याला कारणीभूत कोण...? मी तर फक्त शेअर केलीय..! नाही... असली प्रत्येक शेअर थांबवा, जी समाजामधील एकोपा नाहीशी करते. जी समाज मान्य नाहीये. जिच्यामुळे दंगे होऊ शकतात.
       फेसबूक ,व्हाट्सअप, हाईक, मेसेंजर, ट्विटर, ब्लॉग, ॲप, चॅट, सेक्स चॅट, लाईव्ह चॅट, पॉर्न चॅट इत्यादी. मध्ये  आपण  आपली लाईफ इतकी बिझी करून ठेवलीय की त्याचे तोटे उघड्या डोळ्याने देखील आपण पाहू शकत नाही. कोणतेही अॅप इंस्टॉल करताना आपण पट पट पट allow करतो आणि आपली सगळी माहिती संपूर्ण जगाला खुली करतो. फेसबुकवर तर सगळी माहिती जगजाहीर केलेलीच असते. कोणीही त्या माहितीवरून आपल्या बँक अकाऊंट असो वा एटीएम पिन तोवर सर्व काही हॅक करू शकतो. खरं तर त्यांना आपणच आमंत्रित करतो. या एकविसाव्या शतकात माहिती ला खूप महत्त्व आहे. तुमच्या वैयक्तिक माहिती वरुन तुम्हाला पूर्ण पणे देशोधडीला लावता येत.
         मी या समाज माध्यमांना वर दुधारी अस्त्र अशी उपमा देऊ केलीय, फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर द्वारे अपरिचित जगातील अनेक लोकांशी संवाद साधता येतो. संस्कृतीची देवाण घेवाण होते. घरबसल्या अनेक व्यवहार होतात, सगळ काही करता येत, काही लोक याचा वापर खूप चांगला करतात. रक्तदान शिबीराची माहितीसाठी, अनेक मेळावे रोजगार संधी बाबत माहिती देण्यासाठी, अनेक नवीन गोष्टी, नवीन सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी,  गरजवंताला मदत करण्यासाठी पण सद्य स्थितीला विचार केला तर अनेक माहिती खोट्या स्वरूपाची, खात्री नसणारी, कोणी तर गम्मत म्हणून टाकलेली असच बरच काही पहावयास मिळते. परवा परवा तर एक फॅड आल होत, एक शेअर करा या बिचाऱ्या ताई साठी... एक शेअर करा या आजोबा साठी... शेअर करा मग त्यांच्या अकाऊंटवर पैसे जमतील. अश्या फालतु गोष्टीचा आपण पहिला विचार करायला हवा. शेअर मुले त्यांना पैसे मिळू शकतील का? या दुधारी अस्त्राचा वापर आपण कसा करतो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 


         खरं तर या सोशल मीडिया वरील कचरा इतका वाढलंय की मग लोक खऱ्या माहिती वर देखील विश्वास ठेवत नाहीत. आणि मग अश्या लोकांची गत  'लांडगा आला रे' या गोष्टीसारखी होऊन बसते. जेंव्हा खरंच गरज असते तेंव्हा कोणीच मदतीला येत नाही मित्रांनो, तरुणांनो हे जग आपल्या हातात आहे. बदल ही काळाची गरज आहे. आपला मोबाईल स्मार्ट आहे पण आपण स्मार्ट कधी होणार, जेंव्हा आपण स्मार्ट होऊ तेंव्हाच आपला देश महासत्ता होईल.
                  
               ✍️ Abhijeet Bhatale.
                     Journalism department.
                     Shivaji university Kolhapur.
                     Mob. 9764369098

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2