गावाकडची गोष्ट...भाग 1


गावाकडची गोष्ट...


         आमचं बालपण हुड्यात गेलं.. हुडा म्हणजे राधानगरी च्या खुशितल ४० ते ५० घर असणार गाव...
आज देखील गावात गेलं की, सगळ बालपण डोळ्यासमोर उभा राहत, दिवस बदलेल तस गाव देखील बदललं, आणि गावा सोबत गावातील माणस देखील...

        असो, पण माझ्या लहान पणीची माणसं, ते चेहरे, तो रस्ता आणि ते जून दत्ताच मंदिर, सावरीच झाड, लदित जायची वाट, मेड्यातील आंबे, कड्याखाली जाऊन झालेली काटवनातील करवांद, बैलकरांच्या परड्यातील आळूच झाड, तिरफळे आणि सगळ्या गावात प्रसिद्ध अशी ललांडी.. ( त्या perticular आंब्याला आम्ही ललांडी म्हणायचो)...
सच्या भरणकर ने शेंड्याला चडून काडलेली रतांबी, त्याचा कोवळी पान, रामदास आडसुळ ची आज्जी नसताना चोरून नेलेली चटणी मीठ आणि कच्या करवंदाचां केलेला आंबट ठेचा.. त्यावर लाल भडक चटणी आणि थोडंसं मीठ.. जराशी मिळाली असली तर साखर... आणि पाणी...  आमचं विन्या हे करण्यात पठाईत.. आडसुळांच्य परड्यातील बरका फणस...  वड्याच्या पल्याड जाऊन चोरून आणलेला ऊस, संदीप गावडे बरं जाऊन काढलेल्या काजी आणि बोंडू, सावरीच्या झाडाची फुल.. आणि घानेरीच्या काटीला खोचका ठेऊन केलेली गाडी... करवंद खाताना देखील मज्जा असायची, लाल करवंद असेल तर कोंबडा, आणि पिवळ असेल तर कोंबडी.. कुणी प्रथा काढली होती काय माहित पण कोंबडा आहे की कोंबडी हे बघितल्याशिवाय करवंद कोण खातच न्हवत...
          विशाल भरणकर च्या नादाला लागून काढलेलं म्हऊ आणि हातावर चावलेल्या माश्या... अक्षय चीबडे ( भाऊ) च्या परड्यात केलेला किल्ला.. देवळाजवळ पेढला खड्डा मारून केलेल्या खुर्च्या आणि त्यावर प्लास्टिकचे सैनिक.. ओंकार पार्टे च्या आजीने आणलेलं बोंडू मग आम्ही घसा खवखवे तोवर खायचं..
पावसाळ्यात वेगळं च डाव असायचं आमचं.. कुणाच्या तरी सोप्यात गई काढून चालू असायचं आमचं "दहा ची गई... वीस चां ठोका.. तीस ची गई... तेंव्हा तेज्या चांदम ला सगळी भ्यायचीत हेचा टोला बसला की गोटीच फुटायची... दत्ताच्या देवळा त कधी कधी पटानी पण खेलायच.. तर कधी राजा राणी चोर शिपाई... पटानी खेळताना मात्र पकुदा ला सगळी भ्यायचीत.. पावसात फुटबॉल, पाठीत बॉल मारून... सुजवयाची एक मेकांना.. डाव करायची कोण चिडत असेल की ते संपलं... एवढं मारायची.. गुच्ची गुसवून तंगी... कुस्ती.. भांडण... रडणं... दगड मारण... सगळ सगळ माफ आणि मजेशीर असायचं... टायरी घेऊन गाव भर नुसत ऊना ताणातून फिरायच... पण ते लहान पण तेंव्हा कसलं उन आणि कसलं काय... पावसाळ्यात आम्ही दगड पालथी घालून.. खड्डे मारून दानवे शोधून काढणार ( गांडूळ) आणि ते दुसर्याच्या चड्डीत टाकणार... एक च्या बेल मधे शाळेच्या मागे एक स्पर्धा असायची... एकदाच व्हायची ही स्पर्धा दिवसातून... कुणाची सू लांब जाते बघायची सगळी वळीने रांग करून उभा राहायच....
            शिमगा आला की आमचा राहुल भाटळे छकड्यात बसून हलगी विषय हार्ड वाजवायचा...
त्याला साद विन्या द्यायचा... तोवर अमोल राहुल भाऊ बापूंनी बोलावलं आहे असा सांगावा घेऊन यायचा... अमित एक आपला खास दोस्त... सगळ्या गावात याला महेश कोठारे म्हणून ओळखायची... तेंव्हा कुणाच्यात टी व्ही न्हवत्या.. आज पण आठवत बैलकरांच्या सोफ्यात जमनिवर बसून बघितलेला छकुला पिक्चर... माहेरची साडी.. तेंव्हा लय फेमस.. कुबड्या खविस आणि तात्या विंचू...
पिक्चर संपला की आम्ही देवळाजवळ क्रिकेट खेळायला... टीम पडायची स्कीम पण वेगळी होती... मतून या जावा म्हणायचीत... लहान असताना आम्हाला काय माहित... आम्ही 😂😂😂 यायचो..
मग त्यात पण असायचं... हा मागा... काय पायजेल लाल टेमन पायजेल काय हिरवा टेमन...
मग डाव सुरू... कधी दिवस जायचं काही समजत न्हवत... थंडीत पतंग उडवायला प्रवीण भाटळे च्या दारात... मग येतना लाल गोंड्या शेंबडी माशी आणायची तिची चार पख पायाच्या अंगठ्याने दाबून धरायची... गोळी पेंडीचा दोऱ्यान तिच्या शेपटीला चार गाठी मारायच्या... आणि गाव भर बोंबलत ती माशी घेऊन फिरायच... कधी कधी फक्त शेपटी उरायाची...
पण दिवस मात्र भारी जायचं... ना कसली अपेक्षा.. ना कुठलं बंधन.. ना कुणाची भीती... ना कुणाची अडचण.. मुक्त पाखरू होऊन नुसत उडायचं...
          वैताग आला की दुपारचं भात, त्यात दूध, जराशी आमटी आणि साखर एवढं घालून त्याच मिक्स करून मी आणि आमचा वैभव आमचा हा फेवरेट पदार्थ...
दारू च्या बाटल्या देऊन गारेगार खायला आम्ही आंग्रे मामाच्या पाठण.. कधी कधी सकाळीच फुगेवाली बाई यायची.. आणि फुग्यांचा आवाज... मग त्यानं तरी नाहीतर सरकारी चाविवर बायकांची भांडण, त्यानं तरी दिवसाची सुरवात व्हायची... किती जरी कुणी भाडंल तरी सगळ्या जनी एकत्र येऊन रात्री आठ वाजता सुप्रिया ला शिव्या दिल्या बिगर कोण जेवत न्हवत... चार दिवस सासूचे मधील सुप्रिया लय बाद राव.. अनुराधा.. आणि अलका कबुल गावात लय म्हणजे लय फेमस... गावात टी व्ही काही ठराविक घरातच...
       तवा कुठला डोरिमोन आणि कुठला शिनश्यान... चांदोमामा बघत आम्ही भात खायचो... बचत गटांची मीटिंग असली की एक लय मज्जा.. रात्रीच इस्टॉप पार्टी त्या दिवशी हमखास कारण सगळ्यांच्या आया यायच्या.. मीटिंग ला... मग आमचा डाव फिक्स... सांगावकर आजोबा शेरितून येताना पारले चॉकलेट चार आण्याच घेऊन यायचा याची सायकल आली की सगळी पोरं गोळा व्हायची... चॉकलेट मागायला.. आमच्या वैभव ला लाल्या म्हणायचा आज्जा... कधी दोघात एक चॉकलेट मिळालं तर चावून आर्ध करून खायचं...
        सगळी गल्ली एकत्र येऊन बापू बिरू वाटेगावकर बघायची... त्यात कुणाचं तर पोर रडणार मग शंकरू आबा कावयाचे... मी पहिल्यांदा फोन वर चौथी मधे असताना अक्षय चिबडे सोबत बोललो होतो... त्यानं शाळा आहे का विचारायला फोन केला होता.. आडसुळ च्या फोन वर... सगळ्यांच्या पाहुण्या कडे यांचा नंबर होता... कुणाचा काही निरोप असेल तर तिथं ठेवायचा...
        लहान पण खूप भारी गेलं... गावच न्यार होत आमचं... सगळी एकत्र.. एकमेकांना आधार द्यायची... कुणाचा काय तर बांधायचं असेल तर पाया काढायला गर्दी.. दत्तजयंती ला पिंट्या च्या मम्मी जवळ बसून गोळ आम्ही खायचो... अविनाश परिवर्तन दत्त भक्ती व सेवा मंडळ हुडा... लय भारी वाटायचं... कुणाचं तर लग्न असेल किंवा कुठ पण मांडव असला की मांडवला  कावळा करून खेळायच... दिवस चड्डी वर जायचं आणि रात्र पण...
          पण आज हे सगळ बदललं... गावातल दत्ताचं जून मंदिर नाही राहील.. ना ते सावरिच झाड.. ना आलुच झाड.. ला आमची आवडती ललांडी... ना करवंदाची जाळी.. सगळ बदललं... काळाच्या च्या ओघात... आम्ही सगळ हरवून बसलो...आणि त्या सोबत आमच्या गावच "गावपण" देखील... गावातील माणसं देखील... माणसातील माणूस देखील... पण खर ते दिवस खूप भारी होत... कारण गाव लय न्यारं होत माझ...
Abhijeet Bhatale.
9764369098
     

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2