कोल्हापूर



 रात्रीचे एक वाजून चोवीस मिनिट झाले आहेत... आणि मी ही पोस्ट लिहीत आहे... अर्धवट झोपेतून जागा होऊन... अपरिपूर्ण झोपेत एक परिपूर्ण विचार मनात आला... हॉस्टेलच्या खिडकीतून बाहेर पाहताना जाणवलं,  एरवी झगमनार हे कोल्हापूर, किती शांत झालय... बघेल त्याच्या तोंडावर एकच वाक्य...
अरे पाऊस कमी आहे का...?
अजुन कुणाला काही मदत हविये का...?
अरे भावा हॉस्टेल वर काही प्रॉब्लेम आहे का..?
       स्वतःला या लोकांनी इतकं झोकून घेतलंय की, हे संकट प्रत्येकाला घरावर आल्या सारखं भासत आहे..
आणि खरंच आज याचा प्रत्यय आला.. कोल्हापूर गाव किंवा शहर नाही हे एक घर आहे... इथं जात किंवा धर्म नाही इथं माणुसकीचा वावर आहे.. इथला जावेद मुल्ला भाई मला मला म्हणतो.. एक वर्षी ईद वर कमी खर्च होईल पण अल्लाह देखील पाहिलं.. जावेद भाई नी 2 वेळा स्वतःच्या टेम्पो घेऊन जेवण आणून दिलं.. आज मशजिद मधे हिंदू आणि देवळात मुस्लिम ताटाला ताट लाऊन जेवताना एकाचं गोष्टीवर बोलतात.. येईल कमी पाऊस होईल पाहिल्यासारखं नीट... बसले पुन्हा घडी, तोवर सावरू एकमेकांना..
         कोल्हा"पूर" उद्या ईद परवा गणेशचतर्थीत पुन्हा झगमगुन उठेल.. त्याच जोमानं धरणातल्या गेट पडलेल्या पाण्यावानी... इथं येईल महापूर सदा नी सदा प्रेमाचा, आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा... आज आमचे पापणकाठ ओले आहेत, पण धीर द्यायला पाठीवर हात ढीग आहेत.. पुरात अडकलेले गृहस्त हजारो आहेत, पण त्याला बाहेर काढणारे लाखो आहेत... अरे मदत बास म्हणून सांगावं लागत.. आज इथं देव कुणी पाहिलं नाही, पण प्रत्येक आई ताई म्हणते... "देवा सारखं धाऊन आलाईसा बाबा..." अजुन इथं कुणी कुणाच्या मनगटावर राखी टेकली नाही पण 'ताई तुम्हाला सुखरूप बाहेर काढतो' अस म्हणणार भाऊ इथं आहे... देवाच्या नाही तर White army जवानाच्या पायावर डोकं टेकणार त्यांचं आभार मानणारे लोक इथं आहेत... मुक्या प्राण्यांना कुशीत घेऊन मायेची ऊब देणारी माणसं इथं आहेत..  कोण तर म्हणत होत, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी... खरंच त्याला मी कोल्हापूर ला बोलवेन आणि गर्वाने सांगेन बघ... कारण या गर्दीतील प्रत्येक माणूस तुला माणूसच भेटणार... अस हे कोल्हापूर आहे...  पाणी उतरलं की आम्ही सगळी येतोय प्रत्येक जनाच्या घराला.. आपला भार उचलायला... आपल घर पुन्हा उभ करायला... आपल्या सर्वांच्या मदतीला... ईद ची खीर.. आणि गणपतीचा मोदक खायला...
             माझ कोल्हापूर...
                      आपलं कोल्हापूर...
Abhijeet Bhatale
Shivaji university Kolhapur
9764369098

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2