Breakup written by Abhijeet Bhatale

  
Breakup

    काल माझ्या एका फ्रेंड्स ब्रेकअप झालं, बिचारा खूप उदास होता, रडत होता... आणि मग स्वतःला सावरत देखील होता. परत स्वतःला काहीतरी कंडिशन घालून घेत म्हणायचा, बस झालं परत असल काही नाही करणार... परत कुणावर प्रेम नाही करणार... साला या सगळ्या मुली असल्याचं असतात... 


         तेंव्हा त्याला म्हणालो, मग वर्ष भर काय करत होतास... वर्षभर नाही का समजल... हे बघ "अंजाम ने दुःख दिया, वर्णा यादे तो प्यारी थी !"
ठीक आहे ना, 1 वर्ष ची रिलेशनशिप, कमिटमेंट, किस्से, वादे.... सगळ सगळ सगळ ठीक आहे... वाईट वाटणार... त्रास होणार... सगळ जुन्या गोष्टी परत परत आठवणार... कॉल करावा वाटणार... सॉरी म्हणुन परत गाडी टपरीवर आणावी वाटणार... but, satisfaction जे हवं ते परत नाही भेटणार... उपकार कुणाचे ठेवायचे नाहीत... गेली ना.... गेली... परत नाही आता... Self Respect पहिला स्वतःला दे... मग जग बघ किती respect करत... आणि ती काय आजची उद्या येईल... मग अंगावर घ्यायची की, शिंगावर तेंव्हा ठरव... पण हे cold war आहे यातून पहिला सावर स्वतःला... मान्य आहे त्रास होईल पण कर सहन... खर  कॉल वा मॅसेज करून ईमान नको घालऊ स्वतःचा...


          कस आहे नात्याचा दोर खूप नाजूक असतो... एकदा तो तुटला की परत जुळत नाही,  आणि जोडला तरी गाठ मात्र राहते.. मग ती गाठ पुढं जाऊन सतत तुला टोचत राहते.. खुणावत राहते... बोचत राहते.. आणि कालांतराने जोडलेल्या त्या धाग्याची देखील किंमत कमी होते... मग येतात तडजोडी... मग त्यांचा स्वीकार करायचं की पुन्हा भांडायचं... हा प्रश्न निर्माण होतो... आणि मग परत रडायला चालू.. त्या पेक्षा थांब.... pause घे... काय करायचं आणि काही नाही याचा विचार कर... सल्ला समज किंवा उपदेश... पण,
आनंदात  तिला कोणतही प्रॉमिस नको करू...
रागात तिला कोणतही उत्तर नको देऊ...
प्रत्येक गोष्टीचं solution असत रे, पण आपल्याला patience नसतात... जे काही हवंय ना ते  immediately हवय.. मग मग बदल देखील का असेना... आणि खरंच माणसाला बदलायला थोडा वेळ द्या... सगळी तुमच्या इच्छे नुसार वागतील पण त्या कटपुतलीला नीट हाताळयला तरी शिका...?


✍️ अभिजीत भाटळे.
       शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
       9764369098

         

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2