Posts

वेशा... एक वास्तव घटना... Part 3

Image
ज्योती मनीषा नंतर .. मी तिच्या साईड ला असणाऱ्या दुसऱ्या ताई ला म्हणालो आता प्लीज तुमची माहिती सांगा... तुमचं नाव काय... तिने स्मितहास्य देत आपल नाव सांगितलं ज्योती राकेश राठोड... खूप मस्त हसत होती ही.. खरतर अस बोलण्याचा प्रसंग हिच्या साठी नवीन असावा... पण हिचा धंद्यातील अनुभव या बाकी सगळ्या पेक्षा मात्र मोठा होता... ज्योती म्हणजे याच ज्यांनी मला या सर्वांच्या सोबत बोलानायची परवानगी मिळवून दिली शारदा ताई कडून... मग मी देखील यांना तेच प्रश्न विचारू लागलो..      तुमचं वय किती आहे... माझ वय 30 च्या वर आहे.. मला एक लहान मुलगा आहे.. मग तुम्ही या व्यवसायात का आलात सांगा ना... मला आई बाप नाही.. चुलता लोकांनी माजे लग्न करून दिले होते... तिच्या बोलण्याचा tone जो होता तो सांगत होता की हिला मराठी येत नाहीये.. तरी पण ती मराठी बोलत होती... नुसतं माझ्या सोबत नाही तर गेली आठ दहा वर्ष तिच्याशी बोलणाऱ्या प्रत्येकाशी... हिला पाहिल्यावर मला वाटलं की किती खुश आहे.. यांना समाजाचं जगाचं काहीच देणं घेणं नाही... अस वाटत होत... पण जेंव्हा मी हिच्या सोबत बोलणं सुरू केलं तेंव्हा हिचा कंठ...

वेशा... एक वास्तव घटना... Part 2

Image
याच वास्तव दुनियेतील एक बळी वेशा Part 2 मनीषा     "अभी मै रस्ते पर काम करती हु, अपने वजह दे किसी भी इंसान की future खराब नही करना चाहती"                                                     :     मनीषा        यातील प्रत्येक पानावर एकच विषय आहे वेशा... पण या पुस्तकाची सुरवात या मनीषा पासून झालीय.. होय 23 वर्षाच्या या मनीषा पासून... आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:30 मी हिच्या सोबत संवाद साधत आहे... मित्राला रेल्वे स्टेनजवळ सोडायला आलो होतो फक्त आठवडा भरा पूर्वीपासून डोक्यात विचार होता यांना जाऊन भेटू यांच्याशी बोलू... आणि मगच आपल्या पुस्तकाची सुरवात करू... पण आता 3 वेळा मी यांच्या समोरून फूटपाथ वरून एकडून तिकडे फेऱ्या मारल्या... पण धाडस होईना... धाडस होईना यांच्या समोर उभ देखील राहण्याच... का कुणास ठाऊक पण समाज, लोक, जग कोणत्या नजरेने पाहिल माझ्याकडे या विचारानं मला काही मिनिट अस्वस्थ केलं होत... गुड...

वेशा... एक वास्तव घटना... Part 1

Image
वेशा.... #LASTYEAR #UNPUBLISHED #PROSTITUTION 1 एक विषय मांडत आहे... वेशा... होय... वेशाच... अनेक विषय बोलायला, ऐकायला भारी वाटतात... पण हा विषय असा आहे, चार चौघात बोलायला अनेकांना नको वाटत. किंवा मूर्खपणा वाटतो, काहीजण मुद्दाम स्वतःला अम्म्म मी न्हवे त्यातला, even मला त्या बद्दल काहीच माहीत नाही, अश्या नजरेने या विषयाकडे पाहतात.  तर काहींना समाजाच्या नजरेआड या गोष्टी मांडायला, बोलायला  बर वाटत... पण एखाद्या व्यासपीठावर, कौटुंबिक चर्चेत कधी हा विषय येत नाही, किंवा या विषयी कुणाला विचारावं इतकं धाडस देखील काहींना होत नाही, तस पाहता आपण सगळेच पूर्ता ओळखून आहे हा विषय, पण कधीच व्यक्त नाही होत, कधी एखादी घटना share नाही करू शकत, कुणासमोर मांडू देखील नाही शकत, किंवा हा त्यासाठी काहींचा मोजकाच मित्र परिवार देखील असू शकतो...           खर पाहिलं ना तर पहिला मला या विषयी काहीच माहित न्हवत... काहीस मग समाज माध्यमांद्वारे, काहीस सार्वजनिक चर्चेतून, काही डोळ्यांचा माध्यमातून पहिला समजल आणि वास्तविक रूपानं हवं तर मी समजून घेतलं... विषय खूप गंभीर आहे...

गावाकडच्या गोष्टी... भाग 4

Image
गावाकडच्या गोष्टी... भाग 4      आमच्या गावात फक्त पावसाळ्यात शेती पण  उन्हाळ्यातला  मात्र रोजगार शोधावा लागत होता.. काही काही जणांचे वढ्याच्या बाजूला श्यात होत, त्यांच्यात हरभुरा लावयाचीत... आणि फिरून तवा दोन रुपयाला एक पेंडी विकायचीत... चीबड्यांची आज्जीच्या पाठी लागून आम्ही हराभुरा काढायला जायचाव... तिथं शेतात किती पण खा कोण ईचारत न्हवत... आणि आई ( आज्जी) पण लय माया करायची... विशल्या, भाऊ, राज, रणज्या, मी आमचा वैभव... सगळी जन हातातला डाव सोडून जायचाव... त्या साठी आई ला गोडी लावायला सगळी जन... हरभूर्‍याच्या हव्यासापोटी त्यांना खूप मस्का लावयचाव... हा ते प्रत्येकाच्या अंगात गुण असतात... आणि त्यांना पण ते निरागसपण खूप आवडायचं.. सगळ्यांना घेऊन मग खडीन खाली... शेताची वाट धरायची...( खर तर उत्तम कांबळे यांचं "आई समजून घेताना" हे पुस्तक त्यामध्ये दाखवलेली त्यांची आई आणि ही आमची आई यांच्यात थोडीफार भिन्नता बाकी सगळ सेम)  मग आम्ही आणि आमची टायर... हरबुरा खायला... जाईल तिकडे टायर फिक्स सोबत... सांजच्या पाहरान आम्ही वर गावात येणार... हातपाय धुवून... ...

गावाकडच्या गोष्टी... भाग 3

Image
गावाकडच्या गोष्टी... भाग 3            लहान पणी आई बापाला कमी आणि आम्ही भुताला लय भ्यायचाव... आणि कुणी कुणी सांगून ठेवलं होत... तिथं जाऊ नगोस... मानवर बसल... पाटावर... लिदित.. एकट कुणी जाऊ नगोसा... बोंबड्यांच्या बाविकडे तर फिरकायच पण नाही... भुताच्या लय गोष्टी... आणि आम्ही अस सांगायचो जस की भूत आमच्या परड्यातच आहे.. पण एक गोष्ट नोटीस करण्या सारखी आहे ना... प्रत्येक गावात असा एक तर माणूस अस्तोय ज्यांन भुताशी कुस्ती तरी खेळलेली असती.. नाहीतर भूतान याच्या कडे तंबाखू तरी मागितला अस्तोया... मग याला आमचं गाव कस अपवाद आमच्यात बी होतीत अशी काही...            चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली आम्ही या गोष्टी ऐकायला बसायचं... त्या दिवसात गावात मदारी यायचे.. नंदीबैल वाले यायचे... कडकलक्ष्मी... आम्ही गाव भर यांच्या पाठ ने फिरायचा... असच तेंव्हा अस्वल देखील यायचं... आणि कुणी तर सांगितलं होत.. अस्वलाचं केस गळ्यात असल की भूत भित्यात... मग आम्ही आणवाणी त्या अस्वलाच्या मागंन... त्याची केस वड...

गावाकडची गोष्ट.... भाग 2

Image
गावाकडची गोष्ट.... पार्ट 2          आम्ही शाळेला असताना आमचा गणवेश फिक्स होता... खर तर तेंव्हा सर्व केंद्र शाळे अंतर्गत असणाऱ्या शाळेचा गणवेश खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट... आमच्या वर्गाचा CR पिंट्या होता.. पिंट्या म्हणजे जगदीश कवळेकर... सर याला तवा नाव लिहायला सांगायचे आणि आपली काम करायचे... तेंव्हा आम्हाला येरुडकर सर होते... लय म्हणजे लय भ्यायचाव आम्ही सरासनी... सरासनी राग आला की लाथा बुक्क्या मारायचे.. पण किती मारलं तरी कोणी घरातलं विचारायला मात्र जात न्हवत... सरांचा मार बघून काही जणांनी शाळा सोडली होती... पण आम्ही काही नग असे होतो... आरदांड.... आम्ही नऊ जण आमच्या वर्गात एक मुलगी पण नाही... चौथी चां आमचा पट नऊ जण फक्त... माझा हजेरी क्रमांक पाच होता... तवा वाटायचं की मी वर्गात पाच नंबर न हुशार हाय वाटत..          अंगणवाडी ला असताना सुकडी मिळायची... ताट भरून आम्ही छकड्यात बसून खायचो पण मोठं होत गेलो तस सूकडी बंद झाली... लहान पोरासानी गोड बोलून त्यांना आमिष दाखऊन त्यांच्या डब्यातील किती तरी वेळा सुक...

गावाकडची गोष्ट...भाग 1

Image
गावाकडची गोष्ट...          आमचं बालपण हुड्यात गेलं.. हुडा म्हणजे राधानगरी च्या खुशितल ४० ते ५० घर असणार गाव... आज देखील गावात गेलं की, सगळ बालपण डोळ्यासमोर उभा राहत, दिवस बदलेल तस गाव देखील बदललं, आणि गावा सोबत गावातील माणस देखील...         असो, पण माझ्या लहान पणीची माणसं, ते चेहरे, तो रस्ता आणि ते जून दत्ताच मंदिर, सावरीच झाड, लदित जायची वाट, मेड्यातील आंबे, कड्याखाली जाऊन झालेली काटवनातील करवांद, बैलकरांच्या परड्यातील आळूच झाड, तिरफळे आणि सगळ्या गावात प्रसिद्ध अशी ललांडी.. ( त्या perticular आंब्याला आम्ही ललांडी म्हणायचो)... सच्या भरणकर ने शेंड्याला चडून काडलेली रतांबी, त्याचा कोवळी पान, रामदास आडसुळ ची आज्जी नसताना चोरून नेलेली चटणी मीठ आणि कच्या करवंदाचां केलेला आंबट ठेचा.. त्यावर लाल भडक चटणी आणि थोडंसं मीठ.. जराशी मिळाली असली तर साखर... आणि पाणी...  आमचं विन्या हे करण्यात पठाईत.. आडसुळांच्य परड्यातील बरका फणस...  वड्याच्या पल्याड जाऊन चोरून आणलेला ऊस, संदीप गावडे बरं जाऊन काढलेल्...