वेशा... एक वास्तव घटना... Part 2

याच वास्तव दुनियेतील एक बळी


वेशा


Part 2 मनीषा
   
"अभी मै रस्ते पर काम करती हु, अपने वजह दे किसी भी इंसान की future खराब नही करना चाहती"
                                                    :     मनीषा

       यातील प्रत्येक पानावर एकच विषय आहे वेशा... पण या पुस्तकाची सुरवात या मनीषा पासून झालीय.. होय 23 वर्षाच्या या मनीषा पासून... आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:30 मी हिच्या सोबत संवाद साधत आहे... मित्राला रेल्वे स्टेनजवळ सोडायला आलो होतो फक्त आठवडा भरा पूर्वीपासून डोक्यात विचार होता यांना जाऊन भेटू यांच्याशी बोलू... आणि मगच आपल्या पुस्तकाची सुरवात करू... पण आता 3 वेळा मी यांच्या समोरून फूटपाथ वरून एकडून तिकडे फेऱ्या मारल्या... पण धाडस होईना... धाडस होईना यांच्या समोर उभ देखील राहण्याच... का कुणास ठाऊक पण समाज, लोक, जग कोणत्या नजरेने पाहिल माझ्याकडे या विचारानं मला काही मिनिट अस्वस्थ केलं होत... गुडफुतून गेलो होतो मी काही मिनिट..  जाऊ की नको कस बोलू... काय बोलू... कुठून सुरवात करू... बरं या शिव्या देतील का... मला काही म्हणतील का..? Insult करणार तर नाहीत ना... रोड वरून जाणारी लोक काय म्हणतील.. कोणी ओळखीचं पाहणार तर नाही ना... खरंच किती वाईट समजतील मला... तोंडाला रुमाल बांधू की नको... का कुणास ठाऊक पण असे अनेक विचार मनात येत होते..
           पण मी तरीही थांबलो... स्वतः निम्मा घाबरून सुद्धा स्वतःच्या मनाच्या शांती साठी आवाज वर करून  मित्राला म्हणालो, भावा आपण काय वाईट काम करत नाही... काही होऊदेत पण आज बोलू... आपण काही वाईट करणार नाहीये... आपला हेतू चांगला आहे.. ही गोष्ट दुसर्याच्या नजरेनं वाईट असेल पण आपला हेतू वा उद्देश चांगला आहे...
     
            अस म्हणत मग मी चालू लागलो त्यांच्या दिशेने.. फक्त चारच पावलावर त्या होत्या, चार जणी बसल्या होत्या मी थांबलो... आणि म्हणालो ताई आपल्या सर्वांशी बोलायचं आहे.. एक म्हणाली बोला... तोरा मिरवत.. काय हवंय... तीन तिच्या भाषेत प्रश्न केला... मी म्हणालो काही नकोय पण थोडी माहिती हवीय आपल्या विषयी.. माझ्या आवजाची पट्टी एकदम खालची आणि स्वर खूप मृदू होती... माहिती द्याल का... actually मी एक पुस्तक लिहायला घेतोय वेश्या नावाचं.. मग त्या संदर्भात तुमची माहिती हवीय मला... प्लीज द्याल का... तिने लगेच एका तिच्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या बाई कडे पाहत काय करू या नजरेनं पाहिलं... पण समोरचीला मात्र समजल तिला काय विचारायचं होत... मी मात्र शांत निशब्द उभा होतो तिच्या प्रतिक्रियेची वाट पाहत... ती भिंतीला टेकून असलेल्या दगडवरून ती बाई उठली आणि दोन पावलं पुढं आली... म्हणाली क्या हुआ सर... मी मग लगेच तिचा सुर धरून बोलू लागलो... मॅडम मी एक पुस्तक लिहातोय.. त्या साठी आपली सर्वांची माहिती हवीय तुमच्या वैयक्तिक जीवनात interfair करण्याचा मला काहीच अधिकार नाही.. पण समाजाला, लोकांना even त्या प्रत्येकाला तुमच्या विषयी सांगायचं आहे मला.... जे तुम्हाला ओळखतात... नाव न विचारता किती म्हणून म्हणून तुमची किंमत करतात... रोड वरून जाताना मानेचा काटा 180 डिग्री मध्ये फिरवून तुमच्या कडे पाहतात, उगाच स्वतःचा मोठेपणा दाखवण्या साठी पुढे जाऊन थुंकतात... बस मधून डोकावून पाहत आवंढा घोटतात...
        हे बघ सर आपको कुच भी चाहिए तो आप ऑफिस पे आयिये... तीच मराठी चांगलं असून सुद्धा तोंडातील गुटका थुंकत तिने उत्तर दिलं... तरी देखील मी तिच्या नजरेत नजर घालून तिला समजावू पाहत होतो की विषय किती महत्वाचा आहे.. माझ्या मनातील भीती तेंव्हा गायब झाली होती...शेवटी तिने आपल्या छातीजवळ ठेवलेला अर्धा आत अर्धा बाहेर असणारा मोबाईल बाहेर काढला आणि कुणाला तरी फोन केला आणि म्हणाली madem इथं एक सर आलेत त्यांना माहिती हवीय आमची देऊ का.. फोन मी त्यांच्या कडून घेऊन मी त्यांना समजावू लागलो की मॅडम विषय किती महत्वाचा आहे... मला प्लीज यांची माहिती घेऊ द्या.... काही वेळ मी त्यांच्याशी बोललो... मॅडम ना खूप समजावून व्हिडिओ करणार नाही याची ग्वाही दिली आणि मी फोन तीच्यकडे देऊ केला... त्यांच्या मॅडम नी त्यांना काही दोन मिनिट सांगू केलं आणि पुन्हा फोन ठेवला... त्यांना इतकं काही बोललो की त्यांना मान्य करावाच लागल... होय म्हणे पर्यंत मी प्रयत्न सोडले नाही.. लगेच फोन आपल्या छाती जवळ ठेवत ती म्हणाली ये मनीषा सर को सारी माहिती बताओ अम्मी ने बताया है...

          खर तर तेंव्हा आयुष्यात पहिल्यांदा एका वेश्या समोर बसून मी बोलू लागलो... परवानगी निशी... 23 वर्षाची मनीषा माझ्या समोर होती.. white top आणि जीन्स pant... दिसायला एकदम सुंदर... कोणी पाहिलं तर एका क्षणात प्रेमात पडेल अशी मनीषा... खूप सुंदर दिसत होती... हीच बोलणं इतकं स्पष्ट होत की पूर्ण मनापासून सगळी माहिती देऊ लागली होती... तिला विचारण्यासाठी मी काही 20 ते 25 प्रश्नाची यादी केली होती... त्यातील प्रत्येक प्रश्न मी तिला विचारायचं म्हणून तिच्या समोर पायावरच बसलो..  तीच बोलंन हिंदी होत पण मी मात्र मराठी मधूनच तिला विचारू लागलो हा पण तिला सगळ समजत होत... त्या क्षणी माझ लक्ष फक्त नी फक्त तिच्या बोलण्यावर होत... तिच्याशी बोलताना मला एवढंच वाटलं की इतकी सुंदर आहे ही का करत असेल हा व्यवसाय... तिच्यासोबत बोलताना हा माझ्या मनातील श्रुगार रस मात्र करून सरात कन्व्हर्ट झाला होता... खर तर तिच्या विषयी काही भावना उत्पती होन साहजिक होत पण नाही,  ती बोलू लागली आणि आणि मी ऐकू लागलो मोबाईल मधे रेकॉर्ड करत होतो तीच बोलणं काही तिला प्रश्न विचारात तिच्याशी संवाद साधत होतो...
मनीषा ला म्हणालो तुम्ही या व्यवसायात का आलात...
मग ती सांगू लागली आपली व्यथा मांडू लागली तिच्या शब्दात... मला इथं शब्द बदलायचे नाहीयेत जस आणि जे ती बोलली आहे ते आहे तेच लिहणार आहे तिच्या तोंडच...
       मेरे मा बाप नही है, मेरी दादिने मुजे पाल पोसकर बडा किया.. हमारे परिवार मै किसिने support नही किया...  मेरा स्कूल भी नहीं हुआ मेरा शिक्षा भी नही हुआ... दादी ने बुढापे मे भी पाल पोसकर बडा किया.. हम खेत्त मे काम करते थे.. ओ बिमार पड गयी.. मुझे किदर भी काम धुंडे तो सब गलत नजर से देखते थे..
एक दुकान मे काम को जाती थी तब उसने मेरे छाती पर हात डाला.. मुझे कही इज्जत नही मिळती थी.. तो मैने आपण गाव शहर सब चोडकर नागपूर आई...
तब मैने थान लीया था... और मैने वही पे... नागपूर मे धंदा शुरू किया... तब मै 20 साल की थी... आज ढाय साल हूये है मे धंधा करती है..
तीच बोलणं ऐकताना अंगावर काटा मारत होता... ती खूप भावनिक होऊन बोलत होती... सगळा आपल्या जीवनाचा चित्रपट माझ्या समोर मांडत होती... तिचा भरडा आवाज आणि त्यात तोंडांत गुटका पण तरीही ती गुडघे गळ्यात घालून मला आपली व्यथा सांगू लागली... तिची नजर शून्यात होती... आणि तीच मन एका अश्या भूतकाळात गेलं होत... जे तीन भोगलं होत, सोसलं होत...
मी तिला म्हणालो जेंव्हा तुम्ही पहिला नागपूर मधे धंदा सुरू केलात तेंव्हा तुमचा पहिला अनुभव कसा होता... खर तर माझा हा प्रश्न चुकीचा होता... पण तरीही तीन उत्तर दिलं...
आणि पुन्हा सुरवात केली...
आती है बहुत दिक्खते आती है... पहिली बार बहुत दर्द उठणा पडा... वहा नागपूर मे 2 महिने रह कर म्मे कोल्हापूर आई.. ओर अब मुझे ढाय साल पुरा हु आ है... यहा आये.. मे अकेली रहती हुः  मेरे आहे पीचे कोई नहीं हैं.. जो पैसा आता है उससे मेरा गुजारा हो जाता है...
मनीषा च बोलणं इतकं स्पष्ट होत की ती काही खोटं बोलत न्हवती... ती विचार करून बोलत न्हवती ती जे बोलत होती ते एकदम तिच्या मनात कुठ तरी भरलय आणि आणि एका उद्रेका प्रमाणे ते बाहेर येत होत... तिच्या बोलण्यात स्पष्टता होती... आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मुळे तिने स्वतःच एक कस्टमर सोडलं होत... तिला पैशाची गरज आहे पण समोरच्या माणसाची किंमत देखील, अस मला तिच्याशी बोलताना जाणवलं...
मग मी तिला पुन्हा विचारू लागलो मनीषा तुझ्या या make up बद्दल सांग..
लोग सिर्फ ये बदन और कपडे डेखते है बदंन जितना अच्छा दाम उतना बडा यही है... सब कुछ लगाते है मुह पर सिर्फ सामने वालो को आकर्षित करने के लिये वरणा कोई शॉक नही है... हमारा....
मनीषा कोणी चांगला माणूस तुला भेटला आणि तुला म्हणाल तुझा सांभाळ करेन पण माझ्या सोबत इथून पुढे प्रामाणिक राह तेंव्हा काय करशील...
      कोई नहीं आता सब आते है... जब तक शॉक है तब तक use करते हैं.. बाल बच्चे पैदा करके साल देड साल बाद छोड देते हैं... तिने साईड ला असणाऱ्या महिलेला खुणावत उत्तर दिले... आणि तिने देखील मान दुलावली...
मग असा काही अनुभव आहे का आपला... किंवा कुणा सोबत अस काही घडलं आहे का...??
हा... हुआ है एक के साथ...इसलिये... किसी हम भरोसा नंही करते... और कोण आयेगा हमे अपणाने के लिये... कोई नहीं चाहता की ओ धधेवली के साथ रहे...

मनीषा च बोलणं पूर्ण होईना मला मग तिला पाहून एक प्रश्न मनात आला तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच मी तिला विचारून टाकला... मनीषा तू कधी कुणावर प्रेम केलीयेस का... तिच्या समोर मी घुडग्यावर बसलो होतो...माझ्या मांडीवर तिने हात माराला आणि हसून म्हणाली
        कभी नहीं किया यार... मुझे आदमी लोग से नफरत है... मेरे जैसे लडकिया प्र्यार करती है... भरोसा करती है.. आदमी लोग बिस्त र करते हैं  औंर चोड देते हैं... यहा पे रास्ते पे आदमी लोग बिस्तार करते हैं जाते है... हमरा शॉक भी पुरा होता है... और हमे पैसे भी मिळते है...आदमी रखणे की क्या जरुरत है.. आदमी रखेंगे और हमे हमारी धंदेवली के नाम से फुकारेंगे कैसा लगेना... इस लिये हमे आदमी नहीं चाहिए...

हमारी जो मा हैं उन्होंने हमे सहारा दिया हैं.. मेरे लिये बस सब कुछ वही हैं अब से... अगर कोई भी आफत आये तो वही हैं मेरे लिये... तिने मग शारदा ताई विषय पुन्हा सांगन सुरू केलं... शारदा ताई म्हणजे या सगळ्यांची आई... यांना आधार देते... कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर solution म्हणजे शारदा ताई...
       मनीषा मला एक सांग बऱ्याच ठिकाणी agent लोक असतात... बाहेरून मुली आणतात... त्यांना धंद्यावर बसवतात.. पहिला तिचा स्वतः उपभोग घेतात... आणि तिच्या मिळकतीचा हिस्सा देखील... अनेक पुस्तकात अनेक चित्रपटात दाखवलं आहे त्याबद्दल काय सांगशील...
      वैसा कुच नहि हैं... मुझे तो कोई नाहि लाया.... माई खुद आयी... और आपणी मर्जी से.. मुझे किसे पैसा देणा नही पडता... जो होता हैं सब मेरा हैं..
हमारी मे जो बुडी औरते हैं अगर उन्हे पैसा नाही मील तो कभी कभी हजार डेड हजार हम देते हैं...
बरं मनीषा पोलिस लाईन चां तुला काही प्रॉब्लेम होतो का...? नहीं कुच नाही होता... कभी केस करणी हो ओ ले जाते है... और कोर्ट मै खडा करते हैं.. हम गुन्हा कबुल करे तो वापस छोड देते हैं... हम जुरमाना भर लेते हैं...
और एक बात हमारे पास हायफाय लोग नाही आते ऐसी ही सब छोटे मोठे आते है...
मनीषा माझा शेवटचा प्रश्न समाजामध्ये अनेक लोक आहेत बरेच तुझे custmer असतील तर चार पैसे दिलं की तुला हवं तसं हाताळणारे.. बाबाचा माल समजणारे भेटले असतील.. त्या बद्दल काय सांगशील...
बहुत होते है.. पर बहुत लोक दयाळू भी होते है... बिस्तर करणे से पहिले हमे पूछते हैं क्यू करती हो.. हमारी मजबुती समज लेकर बिना बिस्तर किये चले जाते है पैसा रख कर... बहुत से लोग बडी बडी कार मै आते हे हमे पुरणा नया कपडा लता दे जाते है..
सब कोई बुरे नही होते.. हमे समजणे वाला भी कोई होता हैं... जैसे आप हो... अस म्हणत तीने स्मितहास्य दिलं... आणि मी देखील ते स्वीकारून तिला ही स्मित हास्य दिलं... तिला मी तिला आलेल्या वाईट अनुभव वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या विषयी प्रश्न विचारत होतो पण तिने जे चांगलं आहे ते सांगितलं...
        मनीषा 23 वर्षाची मी देखील 23 वर्षाचा... आमच्यात age फॅक्टर same होता... मी तिला बोललो देखील... तेंव्हा ती म्हणाली आप का स्कूल हुआ हे मेरा नही... हसत हसत ती बोलली...
मनीषा या धंद्यात खूप रुतून बसलीय हिला बाहेर काढणं खूप अवघड काम आहे... एवढच मला समजल... आणि मग मी हीची रजा घेतली... आणि त्या दगड रुपी स्टेज वरून तिला उठऊन या स्टेज वर एका नवीन चेहऱ्याला बोलण्याची संधी दिली... बोलण्याची नाही रडण्याची म्हणायला हवं.. ही प्रत्येक जण आपल दुखणं आपल्या सुरात मांडत होत.. आणि मी ते दुःख रेकॉर्ड करून घेत होतो.. त्यांना माहीत होत हे दुःख काही कमी होणार नाही... पण सांगून मांडून किंवा व्यक्त करून थोडा धीर भेटल तेवढच समाधान मी त्यांना देत होतो... दहा मिनिटाच्या संवादात सगळच नाही येणार पण जितकं होईल तितकी यांनी मला सांगू केलं...
आठ मिनिट झाले मी मनीषा सोबत बोलत होतो... या आठ मिनिटात माझ्या मनातील भीती पूर्ण गेली होती... तिच्या विषयी तुच्छता नाही तर आदर वाढला होता... त्या सगळ्या माझ्या पेक्षा मोठ्या पण प्रत्येक जनी मला सर म्हणत होत्या .... तुम्ही पाहिलेली वेश्या  आणि मी दाखवत आहे ती वेश्या यात बराच फरक दिसेल तुम्हाला... कारण तुम्ही तुला फक्त 5 मिनिट पाहिलं असणार.. त्या मधे दोन मिनिट बोलला असणार... जा कधी तर संवाद साधायला जा नक्की भेटेल जी मी तुम्हाला दाखवतोय....



Abhijeet bhatale
Shivaji Univercity kolhapur
9764369098

माझी पोस्ट शेअर करायला माझी ना नाही

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2