वेशा... एक वास्तव घटना... Part 1


वेशा....
#LASTYEAR
#UNPUBLISHED
#PROSTITUTION

1

एक विषय मांडत आहे... वेशा... होय... वेशाच...
अनेक विषय बोलायला, ऐकायला भारी वाटतात...
पण हा विषय असा आहे, चार चौघात बोलायला अनेकांना नको वाटत. किंवा मूर्खपणा वाटतो, काहीजण मुद्दाम स्वतःला अम्म्म मी न्हवे त्यातला, even मला त्या बद्दल काहीच माहीत नाही, अश्या नजरेने या विषयाकडे पाहतात.  तर काहींना समाजाच्या नजरेआड या गोष्टी मांडायला, बोलायला  बर वाटत... पण एखाद्या व्यासपीठावर, कौटुंबिक चर्चेत कधी हा विषय येत नाही, किंवा या विषयी कुणाला विचारावं इतकं धाडस देखील काहींना होत नाही, तस पाहता आपण सगळेच पूर्ता ओळखून आहे हा विषय, पण कधीच व्यक्त नाही होत, कधी एखादी घटना share नाही करू शकत, कुणासमोर मांडू देखील नाही शकत, किंवा हा त्यासाठी काहींचा मोजकाच मित्र परिवार देखील असू शकतो...


          खर पाहिलं ना तर पहिला मला या विषयी काहीच माहित न्हवत... काहीस मग समाज माध्यमांद्वारे, काहीस सार्वजनिक चर्चेतून, काही डोळ्यांचा माध्यमातून पहिला समजल आणि वास्तविक रूपानं हवं तर मी समजून घेतलं... विषय खूप गंभीर आहे इथं नैतिकता देखील खूप matter करते, अनेक वाईट गोष्टींपासून स्वतःला प्रवृत्त करते, मग मी ठरवलं की या विषयाचा जरा खोल जाऊन अभ्यास करायचा वाचन करायचं... म्हणून आमच्या विद्यापीठातील opac वर जितकं मी search केलं ते सगळ वेेश्या विषयीच... मग राजन गवस यांच्या भाऊ पाध्ये यांच्यावर लिहलेले लिखाणातील सुमन ची गोष्ट असेल... किंवा लक्ष्मीकांत यांनी अनुवादित केलेले वेशा जीवन असेल, "वेशां आणि त्यांची मुले" हे पुस्तक... बाईमानुस, बारबाला, भारतीय गणिका आणि काही अनुवादित मराठी पुस्तके... पण या पुस्तकांच्या दुणयेपेक्षा वास्तविक दूनायेतील जी दाहकता मजलिये ना ,त्यात मला प्रवेश करायचा होता... आज अनेक सेक्स वर्कर आपल्या कोल्हापुरात आहेत... त्यांना मिळालेलं नाव त्यांची जागा...त्यावरून आमच्यात होणारे अनेक जोक्स किंवा अनेक गोष्टी ज्या मांडताना काहीस तुच्छ वाटेल, पण सत्य मांडून जगासमोर एका वेशेचा डावा पदर मांडन्याचा एक अल्पसा प्रयत्न करत आहे...
          सांगलीतील गोकुळ नगरी, पुण्यातील बुधवार पेठ, आणि कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी किंवा रेल्वे फाटक काहीस व्हीनिस कॉर्नर ही काही प्रसिद्ध ठिकाणे...
खर तर या जगात आमचा पहिला प्रवेश गेल्या चार महिन्यांपूर्वी... एक मित्र सांगली हून आला होता, म्हणाला अरे खूप कंटाळा आलाय चला आज काय तर आजवर न केलेलं करायला जाऊयात म्हणून पहिला आम्ही हॉटेल ला जेवण केलं आणि तेथून वेश्या पाहण्यासाठी गेलो,  नेमक काय असत ते तर पाहू... नाहीतर आम्हाला अनेक पिक्चर मधेच बघून माहिती,
                      त्या दिवशी मग आम्ही गेलो अश्या दुणयेत ज्याला आत जाण्याचं दार आहे पण बाहेर पडायला एक सुराग देखील नाही... त्या दिवशी मी गेलो अश्या दुनयेत तिथं माणूस किंवा माणुसकी या शब्दलां किंमत नाही...  खर तर छाती वर करून स्वतःच्या देहाची वेगवेगळी किंमत करून चरित्रावर डाग ओढावून घेणाऱ्या अनेक स्त्रिया पहिल्या.. आणि मग भारावून गेलो आम्ही, थांबलो त्या प्रवासात.. प्रवास तेवढाच आणि तितकाच त्या दूनायेची अराजकता नाही पाहू शकलो, एक विशितील मुलगी असेल ती स्वतःच ईशारे करून भुलऊ पाहत होती येणाऱ्या जाणाऱ्या अनेक तिच्या गिऱ्हाईकना, एवढी धिट झाली होती, तिघेही विचार करू लागलो च्यायला काय दुनिया आहे ना कुठ सुख तर दुःख मग मनात एक विचार आला, की दुणयेचा आणि जगाचा त्यांच्यापूर्त्या विस्तारलेल्या माणुसकी शून्य भावनेचा आणि हरलेल्या सर्व मार्गांचा अभ्यास करू जगा समोर ते मांडू जे खरंच सत्य आहे... वास्तव आहे... या दुणयेतील अश्याच काही प्रवाशांची कहाणी ज्यांचा प्रवास सुरू झालाय पण त्यांना destination नाही भेटल... हरवेल्या या मुसफिरांची कहाणी ज्यांना कुणी तर या गाडीत बसवलंय आणि सोडून देलय एका नवीन प्रवासाच्या दिशेने.. कुनितर डांबून, हिसकावून, धमकी देऊन धाक दाखवून आणलय आणि सोडलय या स्वापदांच्या फुनयेत...

2
एक वेश्या
 
            का आलयेस तू इथं.. का आला आहेस तू इथं.. या लाचारांच्या हिजड्या दूनयेत, काय काम काढलंस, की तू देखील शर्टाची चार बटणे खुली करून तुझी हावस भागवायला आलास, कुणाच्या तर उरावर पडायला,  तिचा भोग घ्यायला. खर सांग... "नाहीस ना तू यातील एक".  नाही काय आहे ना...? "इथं माणसं येत नाहीत"...! येतात ती फक्त जनावरे, आणि तुझ्यात कुठ तरी मला माणूस दिसला म्हणून तुला नाही, खरतर तुझ्यातील त्या माणसाला मी प्रश्न केला.. नाहीतर या असमाजमान्य धंद्यात आमची तोंड वर करून प्रश्न विचारायची लायकी नाही. अस काहींचं मत आहे.
 आणि हो... ते आम्ही देखील मान्य केलंय... मान्य केलंय या देहान की तो पडेल त्या प्रतेकासाठी, त्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्यान माझ पोट भरू शकेल..
सगळ जग एकत्र आल आणि ते काय तर ह्यूमन राइट्स म्हणून काय तर काढलं तेंव्हा वाटल खरंच आता आम्हाला देखील माणूस म्हणून जगता येणार... पण १९४८ पासून मी अजून पाहतेय कोणी आमच्यातील वेशीला कधी मिळालंय का यातील माणूसपण.. नाही रे... पंधरा वर्षांपूर्वी चाळीस हजार रुपयाला विकलेल्या या गुलामी देहान कशी अपेक्षा करायची .. मानवी हक्काची...
खर तर रेड लाईट  एरिया सोडला तर आम्हाला देखील समाजात मान हवा आणि त्याची आम्ही अपेक्षा करतो. पण अनेकांनी ढकलून दिलय आम्हाला या डोहात ज्याच्या पात्राचा विस्तार दिवसेंदिवस आम्ही जिथं जिथं जाऊ तिथं तिथं येत आहे... मग आम्ही देखील मान्य केलं या समाजाला त्यांच्या आमच्या विषयी असणाऱ्या कल्पनांना.. जो जो आमच्या कडे येतो ना तो खरंच विसरतो की ही बाई आहे.. किंवा ही देखील माणूस आहे.. त्याची हावस भागे तोवर तो शांत.. एकादासा झाला रिकामा की निघाला आपल तोंड बांधून पुन्हा तुमच्या दुणयेत.. स्वाभिमानाने अभिमानाने जगायला.. ताट.... मान वर करून... पण खरंच कुणाच्या तर जबरदस्ती मुळ आज आमच्यावर ही RMD आणि ही पानं.. ही गुटका खायची वेळ आलीय.. सवय नाही आम्हाला याची पण प्रत्येकाच्या तोंडात जायची इच्छा नाही होत... आणि कुणाचं तर प्रेम आल् तर ते चार ते पाच मिनिटं पुरतच येत ( थोडंसं हसत)
           आता तू म्हणशील मग का पत्करालीस हा मार्ग, माहित आहे ना..? या वाटेला किती काटे आहेत, तर बाबा, "तुझ्या आधी बरीच जन हे ईचारुन गेलीत खर आमचा मार्ग नाही बदलू शकलो आम्ही".. आणि काटे म्हणत असशिल तर आहेत, आहेत इथं अनेक दलाल, काटे... पण त्या काट्यांच्या जीवावर पोट भरतो म्हणायचं... भडव्याना पैसा हवाच... आणि यांच्याकडून आम्ही पैसे घ्यायचा नाही... यांचं देखील ओझ असत आमच्या छाताडावर... कीव आलाय या जगण्याच्या पण काय करणार.. लाचार नजरेने आज तू आमच्या कडे पाहत आहेस. कधी तर आम्ही देखील याच नजरेनं कुणाकडे तरी पाहत होतो समाजानं काय वेळ आणलिये नजर फक्त बदलली आणि तिला माझ रूप दिलंय...
         होय... अरे....  रुपावरच तर सगळ आहे आमचं... जोवर रूप आहे तोवर कोण तर आहे.. तिथं पण तुम्हाला choice हवाय... जरा वेळ बस इथं आणि बघ किती demads असतात. किती प्रश्न पडतात. चार पैसे दिलं की स्वतःच्या बापाचा माल समजू लागतो प्रत्येक जन.. होय माल... तीच लायकी राहिलीय आमची. माझ्या तोंडावर तुला हसू दिसलं. शृंगार दिसेल पण माझ आतड काय म्हणतंय तुला काय सांगू.. अरे या तोंडावर शृगार आणय साठी पण दर दोन तासात एक नवीन थर चढवतो आम्ही.. कुणी तर उतरवावा म्हणून.. फक्त थर चडवण्याच  उतरवण्याच समाधान. तुझ्या भाषेत make up...  तुमच्या आयुष्यात अनेक भिभस्त असतील प्रेम, भावना, विचार पण आमच्या आयुष्यात फक्त एक हावस, एक इच्छा आणि कुणाचं तर ओझ... इतकंच आहे... चार पैश्याच्या मोहन यात उतरले आणि आयुष्याची राख रांगोळी करून बसलेय... ना समाजात मान आहे ना ईज्जत... पण हा पोट भरतोय म्हणायचं माझ आणि माग दोन जण उरल्यात त्यांचं...  काल परवा कोण तर म्हणत होत आयुष्य खूप सुंदर आहे.. पण ते आयुष्य जगायला ही ती दुनिया नाहीच आहे.. इथं कोणी नाही म्हणणार इथं फक्त देहाचा व्यवहार... आणि बाजार चालतो.. बाजार.. आणि त्या बाजारातील मी माल आहे... तोवर ताजा आहे तोवर गिऱ्हाईक आहे... उद्या शीळा झाला तर कोण ढुंकून पण बघणार नाही, असा माल...
          तू जा बाबा या दूनायेतू खरंच जा तू इथून... हि दुनिया... ही दुनिया लय लय बेकार आहे नको वावरू या दुनयेत कोण तर चुर्रा करील तुझ्या भावनांचा..
 खर हा... कधी तर ये आमच्या दूनीयेत फेरफटका मारायला कारण जंगली स्वापदमधे माणूस पहिला की बरं वाटतं... समाधान मिळत...


Abhijeet bhatale
Shivaji Univercity kolhapur
9764369098

माझी पोस्ट शेअर करायला माझी ना नाही

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2