वेशा... एक वास्तव घटना... Part 3


ज्योती

मनीषा नंतर .. मी तिच्या साईड ला असणाऱ्या दुसऱ्या ताई ला म्हणालो आता प्लीज तुमची माहिती सांगा... तुमचं नाव काय... तिने स्मितहास्य देत आपल नाव सांगितलं ज्योती राकेश राठोड...

खूप मस्त हसत होती ही.. खरतर अस बोलण्याचा प्रसंग हिच्या साठी नवीन असावा... पण हिचा धंद्यातील अनुभव या बाकी सगळ्या पेक्षा मात्र मोठा होता... ज्योती म्हणजे याच ज्यांनी मला या सर्वांच्या सोबत बोलानायची परवानगी मिळवून दिली शारदा ताई कडून... मग मी देखील यांना तेच प्रश्न विचारू लागलो..
     तुमचं वय किती आहे...
माझ वय 30 च्या वर आहे.. मला एक लहान मुलगा आहे..
मग तुम्ही या व्यवसायात का आलात सांगा ना...
मला आई बाप नाही.. चुलता लोकांनी माजे लग्न करून दिले होते... तिच्या बोलण्याचा tone जो होता तो सांगत होता की हिला मराठी येत नाहीये.. तरी पण ती मराठी बोलत होती... नुसतं माझ्या सोबत नाही तर गेली आठ दहा वर्ष तिच्याशी बोलणाऱ्या प्रत्येकाशी... हिला पाहिल्यावर मला वाटलं की किती खुश आहे.. यांना समाजाचं जगाचं काहीच देणं घेणं नाही... अस वाटत होत... पण जेंव्हा मी हिच्या सोबत बोलणं सुरू केलं तेंव्हा हिचा कंठ मात्र दाटला होता..

तुमचं गाव कोणतं
मी बिहार ची आहे... चुलता लोकांनी माझ लग्न करून दिलं..  पाणी पुरी विकणाऱ्या माणसा सोबत मग आम्ही आमचं गाव तेन सगळ सोडून सोलापूर ला आलो.. तिथं पाणी पुरीचा गाडा सुरू केला.. धंधा पण चांगल्या चालू झाला... सगळ चांगलं चाललं होत..

 मग मला समजेना सगळ ठीक होत तर काय झालं नेमक ज्यामुळे हा दिवस आला...
मला एक मुलगा पण झाला त्या पासून... आमच्या मागारी त्याने सावकारा कडले 40000 रुपये काढले होते.. दारू पिण्या साठी खाण्या साठी.. ज्यांची आम्हाला माहिती पण न्हवती.. हळू हळू गाडा पण बंद पडला... खायचे वांदे झाले होते त्यात लहान पोरं... मग एके दिवशी त्यानं मला म्हणाला," आपल्याला बाहेर जायचं आहे, सारखं भांडत असायचो आम्ही.. पैसे न्हवते खायला काही न्हवत." मग मला त्याने त्या सवाकरा कडे नेलं आणि मला चाळीस हजार रुपयात त्याला विकलं...

मला तर खरंच काही पटेना... पण हिच्या डोळ्यातील अश्रू खोटं न्हवते बोलत... खूप वाईट वाटलं.. एकीकडे आम्ही देश कुठ नेहण्याची स्वप्ने पाहतोय.. पण इथं तिला गुलाम करून ठेवलं होत... अशी गुलाम जीचा फक्त आणि फक्त उपभोग घेण्या साठी वापर केला होता..
 ति खूप रडू लागली... आणि रडतच बोलली..
मी सर खूप रडलो.. अस नको करू... पण नाही... मला मारलं... आणि तिथं टाकून गेलं... एका बाईन महिन्यान मला  तिथन बाहेर काढलं मी पळून आल तवा... कोल्हापूर ला.. तिने सांगितलं होत हिथ व्हिनस कॉर्नर ला सोखोई मसाज सेंटर आहे तिथं जाऊ तिथं काम भेटेल आपल्याला... म्हणून आम्ही तिथं कामाला आलो... तिथं मालकानं काम करून घेतलं आणि पैसे नाही दिले.. मग आता काय करायचं म्हणून एका बाईने सांगितलं हीथ स्टेशन ला धंदा चालत करतीस काय... रात्र भर विचार केला.. आता काय राहिलाय म्हणून दुसऱ्या दिवशी जाऊन बसले स्टेशन वर.. तेंव्हा मुलं पण एक वर्षाचं होत.. मग मॅडम ला जाऊन भेटलो माझी सगळी कहाणी त्याना सांगितली.. त्यांनीच मला आसरा दिला .. त्यांच्या जवळ ठेवले... आम्हाला आधार कार्ड... Pan कार्ड.. रेशन कार्ड ज्या ज्या सेवा भेटतात त्या सगळ्या देऊ केल्या... मग इथं बसले आम्ही... आणि इथंच बसते....
गेली अनेक वर्ष अनेक जणांनी हिचा भोग घेतला असेल.. कधी रडली असेल... कधी हसली असेल... पण हिला कुणी कधीच समजून घेतलं नाही...
मग आपल मुल कुठ आहे.. मी लगेच तिला विचारलं...  तिने आपल्या मोबाईल वरील आपल्या मुलाचा dp दाखवला.. आणि डोळ्यातील पाणी पुसत म्हणली आता पाचवी ला आहे... सोलापूर ला एका ओळखीच्या बई कडे ठेवलाय त्याला संबलते ती... महिन्या चार हजार रुपये जमवून तिला पाठवून देते.. तीच तिचा संबाल करते.. कधी तर दोन तीन महिन्यातून.. जाते बाळा कड.. तेंव्हा ते मला म्हणत.. मम्मी तू हित का नाही राहत.. त्याला मी सांगितलं आहे कपड्याच्या दुकानात कामाला आहे म्हणून...

खूप वाईट वाटत सर.. मुलगा जेंव्हा काय करतेस म्हणून विचारतो आणि मी त्याच्याशी खोटं बोलतो

पण अस किती दिवस चालणार आहे...
जोवर त्याला कळत नाही तोवर चालवायचं आहे... जेंव्हा कळायला लागेल तेंव्हा बंद करेल..

मग आताच का नाही करत... कुठ काही काम का नाही करत मी तिला विचारलं...
सर ही दुनिया बेकार आहे... मी गेले होते.. संजय घोडावत च्या एका हेच्यात कामाला... तिथं कुणी तर पाहिलं आणि त्या साहेबाला सांगितलं...  ही बाई स्टेशन बाहेर धंदा करते.. मला त्यांनी कामाचे पैसे पण नाही दिलं... हाकलून काढलं त्या साहेबान तिथून..

मग... गांधीनगर ला एका कपड्याच्या दुकानात.. कामाला जात होती.. तिथं फरशी पुसली.. सगळी त्यांची काम केली.. तिथं पण एका माणसाने येऊन सांगितलं मालकाला तिथून पण हाकलून काढलं मला...
   सर आमच्या जगण्याला काही किंमत नाही, चोता झालंय आयुष्याचा.. परवा ची गोष्ट हाय.. मी अशीच धंद्यावर बसली होते तिकडून एक माणूस आला मला म्हणाला किती मी पण किंमत सांगितली.. त्याने मला कानाखाली दिली आणि म्हणाला पैसे देणार नाही चल नाहीतर मारणार.. साहेब सगळी लोक बघत होतीत पण कोण पुढं नाही झालं मला काढून घायला, खूप रडले साहेब मी खूप रडले चार दिवस झोपून राहील एवढं मारलं होत त्यानं...
    माफ करा पण हा आपला सगळ्यात वाईट अनुभव असेल ना म्हणून मी तिला प्रश्न केला.. नाही .. म्हणत तिन मान डोलावली अन् पुन्हा एका कटु अनुभवाला सुरवात केली..
      साहेब मला आठवडा झाला होता धंदा सुरू करून मला लय वाईट वाटत होत कस्टमर करून मी रडत बसले होते.. साडी तशीच पंख्याला बांधून गळफास लावून घेत होतो तेंव्हा लॉज च मालक आल अन् म्हणाल पोरगं आहे त्याच काय करणार अहिस.. साहेब मी तेंव्हा पासून त्या पोरापाई जगतेय ओ...

यांचं बोलणं मला नाईलाजानं थाबवाव लागलं मनीषा पुढं झाली अन् तिला सावरू लागली.. मी पण भावनाशून्य होऊन सगळ्यांची तेंव्हाच रजा घेतली अन्. विद्यापीठ च्या दिशेनं आम्ही चालू लागलो...
ते प्रसंग ते अनुभव मित्रांसोबत शेअर केलं अन् पूर्ण रात्र आम्ही त्यावर चर्चा केली..
    आलेलं हे सगळ्यात वाईट अनुभव अन् शेवटची कहाणी तिथून पुढं कधी या कहाणीला नवीन कहाणी जोडण्याचा प्रयत्न नाही केला वा झाला..
यांच्या आयुष्याचा कहाण्या त्यांची दुःख अन् अन् त्यांचं अनुभव त्यांच्यावर सोपवून मी काढता पाय घेतला त्या दुणयेतून...

निःशब्द....

Abhijeet bhatale
Shivaji Univercity kolhapur
9764369098

माझी पोस्ट शेअर करायला माझी ना नाही

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2