चाय पे स्टोरी... पार्ट 3

चाय पे स्टोरी... पार्ट 3
TTMM

         TTMM हा शब्द किंवा याचा अर्थ माहित नाही असा कोल्हापुरी मनुष्य क्वचितच.. आज ही मुले काही पैसे जमा करून TTMM ने वडा खायला आली होती... मला माझ्या कॉलेज चे दिवस आठवले वर्गातच आमचं ठरलेलं असायचं ये बाबा TTMM असेल तर जायचं नाहीतर नाही बघ...


          काही जण अनेक वेळा प्रश्र्नर्थी विचारतात, की सुख कश्यात आहे... मग आता मला जर कोणी विचारलं तर मी म्हणेन... 
          "TTMM ने कॉलेज च्या कॅन्टीन मध्ये जाऊन वडा खाण्यात जी मज्ज्जा जे सुख होत ना, तेवढं सुख कश्यात नाही.." आज हेच मित्र बघा ना कोणी पाच रुपये आणलेत तर कुणी पंधरा सगळ्यांचे मिळून चाळीस रुपये जमा केलेत एक दहाची फाटकी नोट, पाचचे तीन डॉलर अन बाकी चिल्लर... पण प्रेम ढीग मैत्री कट्टर... त्या सोबत "भावा" हा शब्द मग आणि काय हवं..
          आश्या वेळी ना कॉलेज मधील मग आपल्या क्राईम पार्टनर ची आठवण तर येणारच ना.. तो क्यू ना एक कप चाय के साथ एक व्हिडिओ कॉल हो जाये आपने स्कूल/ कॉलेज वाले दोस्त को..  
Share this story with your TTMM वाल्या दोस्ताला

Abhiheet Bhatale
9764369098

पहिल्या दोन स्टोरी माझ्या प्रोफाइल वर आहेत नक्की visit करा

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2