चाय पे स्टोरी... 1
चाय पे स्टोरी...
आपला माऊली चौकातील शॉप.. सध्या तरी मी इथं दिवसभर असतो, मग खूप काही लोक, मित्र, ओळखीचे काही अनोळखी, गिऱ्हाईक अने अनेक माणस इथं भेटतात, त्यामधील अनेक माणसं अशी आहेत ज्यांच्या सोबत बोलून खूप काही शिकायला भेटत, तर काही सोबत न बोलता देखिल खूप शिकायला मिळतं..
मग मी आता अस ठरवल आहे, रोज एका माणसाविषयी लिहायचं, आपला अनुभव मांडायचा मग व्यासपीठ काय खुले आहेच.. त्यावर मांडायच
मग मी आता अस ठरवल आहे, रोज एका माणसाविषयी लिहायचं, आपला अनुभव मांडायचा मग व्यासपीठ काय खुले आहेच.. त्यावर मांडायच
स्टोरी १.
या फोटो मधील दोन मुली आहेत त्यांच्या विषयी...
यांचे घरचे आमच्या शॉप समोर म्हणजे रस्त्याच्या पलीकडे केळी विकतात.. अन् त्यांचं घर मात्र रस्त्याच्या अलीकडे आहे रोड वर गाड्या खूप असतात, मग या रोड जवळ येतात अन् अंम्मी अस मोठ्याने आवाज देतात मग घरून काही पार्सल असेल, किंवा इथून घरी काही द्यायचं असेल तर या delivery च काम करतात..

आमच्या बाजूच्या शॉप मधे ( स्टेशनरी) मधे आल्या तेंव्हा यांच्या सोबत मी पहिल्यांदा बोललो योगायोग असा तो शॉप उघडला न्हवता.. ही लहान आहे ना ती मला म्हणाली भैया कधी येणार आहेत हे मला चाप (केसातील) हवाय.. तीच बोलणं एवढं भारी अन् बोबड होत ना की मला संवाद संपवू वाटत न्हवता..
इथं ये ग.. नाव काय तुझ..? मी जाणून बुजून विचारलं..
" माझ नाव आशिया आहे..." ती म्हणाली
ह्म्म.. गप्प आशिया खंड आहे...
नाही ओ माझे नाव आहे ते...
तिला खंड ही संकल्पना माहित असावी एवढी मोठी नाही सोडा ती पण तिची smile, तीच बोलणं मला खूप आवडलं ...
तिला खंड ही संकल्पना माहित असावी एवढी मोठी नाही सोडा ती पण तिची smile, तीच बोलणं मला खूप आवडलं ...
मग मी विचारलं चहा घेणार का..?
ये नाही म्हण नाही म्हण.. म्हणून तिची मोठी बहीण तिला सांगू (धमकावू) लागली😊.. अग असुदे सांग घेणार का पैसे नाही घेत... नाही दादा आम्ही चहाच नाही घेत .. म्हणून त्यांनी निरोप घेतला...
आजची पहिली स्टोरी आपली आशिया के नाम.. खूप काही शिकायला मिळतं या लहान मुलगी कडून..
आजची पहिली स्टोरी आपली आशिया के नाम.. खूप काही शिकायला मिळतं या लहान मुलगी कडून..
अनोळखी व्यक्ती सुद्धा तुमच्या सोबत जेंव्हा बोलत असतो तेंव्हा एक मस्त smile देत बोलायचं.. बाकी आपण कुणाला ओळखतो.. स्वतःला तरी अजुन ओळखू शकलो नाही दुसऱ्याच काय..😅
नवीन अप्रतीम भारी
ReplyDelete