चाय पे चर्चा 2

चाय पे स्टोरी
पोस्ट 2

      तस बघितलं तर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार आमच्या शॉप वर कोण ना कोण तर आजीबाई, वृध्द स्त्रिया किंवा काही महिला जोगवा मागायला येतात काहीजण मदत मागायला... यामध्ये पण मग दोन प्रकार मला दिसतात काही जण देवाचा आधार घेऊन पैसे गोळा करतात मग काही फोटो, मूर्ती किंवा काही असेल.. अन् काही जन मात्र "दादा काय तर दे र सकाळ पासून काही खाल नाही" अश्या प्रकारे..
          मी पण यांना काही ना काही देतो.. यामध्ये एक आजीबाई आहे.. तिचा एक किस्सा ती आजी दर वेळी येणार अन्
 "मुला....!" एवढंच आवाज देणार...
मग मी समजायचं की हा आजींना मदत द्यायची आहे...
हे अस रूटीन चालू होत...

एक दिवस आजी आल्या नी मला म्हणाल्या परवा दुकान बंद होत,  परत गेलो न्हव मी...

मला मात्र हसायला येत होत, पण मी स्वताला आवर घालत म्हणालो, "होय ओ आजी गावी गेलो होतो.. "


राजारामपुरी मधे प्रत्येक शॉप वर अनेक जन मदत मागायला येतात, काहीजण पैसे किंवा काही मदत देतात.. तर काहीजण देत पण नाहीत... असो पण या आजीकडून मला मार्केटिंग शिकायला मिळत...

तुमचं कस्टमर फिक्स करा... त्यांना वारंवार भेटा.. त्यांना तुमच्या प्रॉडक्ट विषयी माहिती सांगा.. तुमची उणीव कशी भासली याच उदाहरण द्या... हे एक अन्

दुसरं म्हणजे काही लोक तर रस्त्यावरूनच विचारतात 
"ये बाबा काही तर दे रे.." म्हणजे डायरेक्ट काउंटर जवळच येत नाहीत, कारण त्यांची द्विधा अवस्था असते... हे देतील की नाही.. पण या आजीचे तसे नाही... हिला तिच्या कस्टमर पूर्ण विश्वास आहे... (Believe to the system) 
ही एक संकल्पना आहे तश्या प्रकारे कदाचित... 

असो तिचा फोटो या पोस्ट साठी शेअर करणं माझ्या विवेकबुद्धी ला पटत नाही म्हणून तिच्याशी मिळता जुळता  गूगल बाबा वरील एक फोटो पोस्ट केला आहे...


Abhijeet Bhatale 
Radhanagari
9764369098

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2