अतिथी देवो भव


                  "अतिथी देवो भव"



     "अतिथी देवो भव"अस म्हणत ज्या भारतात पाहुण्याची देवा प्रमाणे सेवा केली जात होती, पण आज हे म्हणताना देखील थोड ऑकवर्ड नाही का वाटत...?? ह्म्म्म्म अतिथी... आणि त्याला देवा प्रमाणे मानणे... No... Never... Nothing....
        अस देखील होत म्हणे पूर्वी की, कोणी एक वाटसरू असायचा...त्याला कोणी आसरा द्यायचं... अन्  तो आभार मानून जायचा...  खर तर हे सगळ काळाच्या ओघात बदललं... नाही सगळ नाही म्हणता येणार... आपण बदलली... कारण तिचं जमीन आहे... तेच पाणी आहे... नाही, ते आहे तेच आहे सगळ... अमर असून हक्क न गाजवता, शांत आपली दिन क्रिया करत आहे... पण 60 वर्ष जगानारा माणूस जगावर  हक्क गाजवतो ... असो तो खरं तर आपला विषय नाही...
      



 
  आज एक वाटसरू भेटला, सायंकाळीच कधी काळी विद्यापिठात M.Sc passout...  हा  2013 साली... नाव जयदीप म्हणे... साताऱ्याचा... काही ओळख नाही काही नाही....मला म्हणाले...  "ओ भाऊ एक दिवस राहायची सोय होईल का...?जिल्हा परिषद मध्ये काम होतं म्हणून आलोय.. साताऱ्याहून... पण झाली ओ... आणि आज जाऊन उद्या पुन्हा येणं म्हणजे ते उद्या पण होणार नाही... राहायचं कुठ हा प्रश्न होता... जरा बघा ना होतं का काही...
       ( खूप कळकळीने, आणि अगदी शांत सुरात त्याने आपली व्यथा सांगितली even 7 वाजून गेले होते कुठ जान देखील अवघड होत... Watchman ची नजर चुकवून हॉस्टेल मध्ये आले, पण प्रश्न हा होता की कोणी करेल का मदत...)
          मी म्हणालो, Sir मेस मध्ये maneger असतील त्यांना जाऊन भेटा... अस म्हणून , मी रूम मधे गेलो 5 ते 10मिनिटांनी वाटलं अरे त्यांचे काय झालं असेल... भेटली तर असेल का रूम त्यांना even कोणी केली असेल का मदत... काय की... काय करू समजेना... वाटलं अरे जाऊन बघू तरी आहे की गेले... 
      खाली जाऊन पाहिलं एक निराशेचे स्मितहास्य घेऊन bag च्या clip सोबत काही तर करत होते... दिवस भर लाईन मध्ये थांबून कंटाळलेला... निराश... असा... कुठं तरी उससा टाकावं आणि बाकी काही नको मग जेवण सुध्दा राहुदे... कारण या थंडीत उपाशी झोप लागेल पण... अंथरूण पांघरूण विना नाही शक्य नाही कदाचित हाच विचार करत असावा...
       मी म्हणालो..."अहो, सर काय झालं... मिळाली की नाही...?? नाही ओ, बगतो म्हणालेत मेस मॅनेजर...
त्यांचीच वाट पाहतोय... त्यांचे शब्द पूर्ण व्हायचा आता त्यांना म्हणालो... "चला सर कोणी नाही बघणार"... अस म्हणून रूम वर घेऊन आलो  illegally कस राहायचं सांगितलं, कर ते ते आमचे सिनियर... पण गरजेला कुणी सिनियर आणि कुणी ज्युनिअर अस नसत... मेस मधून चोरून डबा आणला... आणि जेवायला दिलं... भारी माणूस होता स्वभावाने... खरंच माणसाला कधी केंव्हा कशी कुणाची गरज लागेल सांगता नाही येणार...वेळ....खूप काही शिकवते ही वेळ.... आणि त्यांची देखील हीच वेळ होती...          त्यांच्या मोबाईल चा एकतर display न्हवता... कुणाला फोन लावायला SIM होत पण number पाठ न्हवत... Google drive आहे ना आता कोण करत पाठ... त्यामुळे आता कुठं जायचं अवगड आणि कोणाला फोन लावून मित्राला बोलवायची अडचण सगळी गोची झाली होती...
          भारी मज्जा झाली होती... काही वेळाने अस वाटलं म्हणालो, आज अतिथी आपल्या दारी आलाय थोडी मदत केली.. उद्या कोणी आपल्याला करेल नाही करेल...पण 5 ते 10 मिनिटांनी जस माझ मन बदललं तस आणि कुणाचं तरी बदलेल... म्हणून लिहण्यासाठी केलेला हा अट्टहास... खरंय मदत करण्याची वेळ प्रत्येक वेळी येत नाही आणि जेंव्हा ती वेळ येते तेंव्हा मदत आपण करेल की नाही काही खात्री नाही, पण खरंच कधी तर कुणाला अशी मदत करून पाहा जी तुम्ही केली, पण सर्वांनी नाकारली होती... तो/ती व्यक्ती कधी नाही विसरणार तुम्हाला... आणि त्याहूनही किती आनंद होतो पाहा स्वतःला, एकादी छोटीशी मदत करून... देवाकडे स्वतःला काही न मागता, इतरांसाठी काहीतरी मागून एकदा बघा... मात्र स्वतःचा काहीही स्वार्थ नको.... काही न मिळून देखील मन किती भरून मिळाल्याचा भास आहे ना हा खूप खास आहे ....

Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2