काही माणसे:-

😃
         ताटाभोवती सांडलेली शिते ताटात घेणारी काहीजणच असतात... पण ताटात शिते असतील तर गोळा होणारे अनेक जण असतात... काही जण म्हणतात शितावरून भाताची परीक्षा होते...पण काही वेळा भात लागलेला/ करपलेला असू शकतो...हे देखील माहीत असावं... आयुष्यात  शिते पाहून येणारी भुते अनेक भेटतील, आणि तुमच्या भोवती गर्दी करतील...पण शिते न पाहता येणारीच त्या गर्दीतील खरी माणसे असतील... आजच्या जगात माणसाला माणूस ओळखणे कठीण झाले आहे... लोकसंख्या वाढेल तसा स्वार्थ वाढत आहे आणि माणुसकी कमी होत आहे... आपण माणूस आहोत, हेच आपण विसरत चाललो आहे

एक कप चहा पित बोलता येईल असा हा विषय चहाचा कप संपता संपून जाईल पण खरंच त्या संपलेल्या चहा च्या कपाप्रमाने कधी तर ही माणसाची स्वार्थी प्रवृत्ती संपेल का....??
         प्रश्नचिन्ह ठेऊन विषय काही काळासाठी काळासाठी हस्तांतरित न करता आणखी 1 विचार येतो किती दिवस आपण असच वागून म्हशीच्या शेपिप्रमाने स्वतःवरच घान मारून स्वतः रडत बसणार आहोत🤔🤔
     
    एक उत्तर नसलेला प्रश्न...!


Comments

Popular posts from this blog

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

गावाकडची गोष्ट.... भाग 2