वेशा... एक वास्तव घटना... Part 3

ज्योती मनीषा नंतर .. मी तिच्या साईड ला असणाऱ्या दुसऱ्या ताई ला म्हणालो आता प्लीज तुमची माहिती सांगा... तुमचं नाव काय... तिने स्मितहास्य देत आपल नाव सांगितलं ज्योती राकेश राठोड... खूप मस्त हसत होती ही.. खरतर अस बोलण्याचा प्रसंग हिच्या साठी नवीन असावा... पण हिचा धंद्यातील अनुभव या बाकी सगळ्या पेक्षा मात्र मोठा होता... ज्योती म्हणजे याच ज्यांनी मला या सर्वांच्या सोबत बोलानायची परवानगी मिळवून दिली शारदा ताई कडून... मग मी देखील यांना तेच प्रश्न विचारू लागलो.. तुमचं वय किती आहे... माझ वय 30 च्या वर आहे.. मला एक लहान मुलगा आहे.. मग तुम्ही या व्यवसायात का आलात सांगा ना... मला आई बाप नाही.. चुलता लोकांनी माजे लग्न करून दिले होते... तिच्या बोलण्याचा tone जो होता तो सांगत होता की हिला मराठी येत नाहीये.. तरी पण ती मराठी बोलत होती... नुसतं माझ्या सोबत नाही तर गेली आठ दहा वर्ष तिच्याशी बोलणाऱ्या प्रत्येकाशी... हिला पाहिल्यावर मला वाटलं की किती खुश आहे.. यांना समाजाचं जगाचं काहीच देणं घेणं नाही... अस वाटत होत... पण जेंव्हा मी हिच्या सोबत बोलणं सुरू केलं तेंव्हा हिचा कंठ...