गावाकडच्या गोष्टी... भाग 4

गावाकडच्या गोष्टी... भाग 4 आमच्या गावात फक्त पावसाळ्यात शेती पण उन्हाळ्यातला मात्र रोजगार शोधावा लागत होता.. काही काही जणांचे वढ्याच्या बाजूला श्यात होत, त्यांच्यात हरभुरा लावयाचीत... आणि फिरून तवा दोन रुपयाला एक पेंडी विकायचीत... चीबड्यांची आज्जीच्या पाठी लागून आम्ही हराभुरा काढायला जायचाव... तिथं शेतात किती पण खा कोण ईचारत न्हवत... आणि आई ( आज्जी) पण लय माया करायची... विशल्या, भाऊ, राज, रणज्या, मी आमचा वैभव... सगळी जन हातातला डाव सोडून जायचाव... त्या साठी आई ला गोडी लावायला सगळी जन... हरभूर्याच्या हव्यासापोटी त्यांना खूप मस्का लावयचाव... हा ते प्रत्येकाच्या अंगात गुण असतात... आणि त्यांना पण ते निरागसपण खूप आवडायचं.. सगळ्यांना घेऊन मग खडीन खाली... शेताची वाट धरायची...( खर तर उत्तम कांबळे यांचं "आई समजून घेताना" हे पुस्तक त्यामध्ये दाखवलेली त्यांची आई आणि ही आमची आई यांच्यात थोडीफार भिन्नता बाकी सगळ सेम) मग आम्ही आणि आमची टायर... हरबुरा खायला... जाईल तिकडे टायर फिक्स सोबत... सांजच्या पाहरान आम्ही वर गावात येणार... हातपाय धुवून... ...