Posts

Showing posts from January, 2019

अतिथी देवो भव

Image
                    "अतिथी देवो भव"      "अतिथी देवो भव"अस म्हणत ज्या भारतात पाहुण्याची देवा प्रमाणे सेवा केली जात होती, पण आज हे म्हणताना देखील थोड ऑकवर्ड नाही का वाटत...?? ह्म्म्म्म अतिथी... आणि त्याला देवा प्रमाणे मानणे... No... Never... Nothing....         अस देखील होत म्हणे पूर्वी की, कोणी एक वाटसरू असायचा...त्याला कोणी आसरा द्यायचं... अन्  तो आभार मानून जायचा...  खर तर हे सगळ काळाच्या ओघात बदललं... नाही सगळ नाही म्हणता येणार... आपण बदलली... कारण तिचं जमीन आहे... तेच पाणी आहे... नाही, ते आहे तेच आहे सगळ... अमर असून हक्क न गाजवता, शांत आपली दिन क्रिया करत आहे... पण 60 वर्ष जगानारा माणूस जगावर  हक्क गाजवतो ... असो तो खरं तर आपला विषय नाही...             आज एक वाटसरू भेटला, सायंकाळीच कधी काळी विद्यापिठात M.Sc passout...  हा  2013 साली... नाव जयदीप म्हणे... साताऱ्याचा... काही ओळख नाही काही नाही....मला म्हणाले...  "ओ भाऊ एक दिवस राहायची सोय होईल का...?जिल्हा परिषद मध्ये काम होतं म्हणून आलोय.. साताऱ्याहून... पण झाली ओ... आणि आज जाऊन उद

The Monk Who Sold His Ferrari

Image
एक संन्यासी ज्याने आपली संपत्ती दान केली...        हिमालयातील एका सुंदर अश्या ठिकाणी रचलेली कल्पनेच्या विश्वातील अकल्पनिक कथा... खूप सुंदर विचार मांडून केलेलं विचार विमर्श... जीवनात खूप कठीण परिस्थितीतून जात असताना वाट दाखवणारे पुस्तक... जेंव्हा सर्व मार्ग संपले आहेत.. आता काय करायला हवं नेमके कस जगाव आणि जगताना कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावं या पुस्तकामध्ये रॉबिन शर्मा यांनी याच एक जिवंत चित्र रेखाटले आहे...        हे पुस्तक वाचताना आपली असणारी संकुचित वृत्ती बदलून नवी चेतना निर्माण होते... रॉबिन शर्मा यांनी यामध्ये ऐका दुर्धर आजाराने ग्रस्त श्रीमंत माणसाची कहाणी रेखाटली आहे...       The  Monk Who Sold His Ferrari , authored by Robin Sharma, is a  book  that takes us on a spiritual journey that pleasantly changes our perception of life.      ज्यांना खरंच अस वाटत ना आता मी काय करू... कस जगू... सगळं संपलं... ऐकही मार्ग नाही उरला... This is the perfect time to change yourself as well as read this book...      
Image
काही माणसे:- 😃          ताटाभोवती सांडलेली शिते ताटात घेणारी काहीजणच असतात... पण ताटात शिते असतील तर गोळा होणारे अनेक जण असतात... काही जण म्हणतात शितावरून भाताची परीक्षा होते...पण काही वेळा भात लागलेला/ करपलेला असू शकतो...हे देखील माहीत असावं... आयुष्यात  शिते पाहून येणारी भुते अनेक भेटतील, आणि तुमच्या भोवती गर्दी करतील...पण शिते न पाहता येणारीच त्या गर्दीतील खरी माणसे असतील... आजच्या जगात माणसाला माणूस ओळखणे कठीण झाले आहे... लोकसंख्या वाढेल तसा स्वार्थ वाढत आहे आणि माणुसकी कमी होत आहे... आपण माणूस आहोत, हेच आपण विसरत चाललो आहे एक कप चहा पित बोलता येईल असा हा विषय चहाचा कप संपता संपून जाईल पण खरंच त्या संपलेल्या चहा च्या कपाप्रमाने कधी तर ही माणसाची स्वार्थी प्रवृत्ती संपेल का....??          प्रश्नचिन्ह ठेऊन विषय काही काळासाठी काळासाठी हस्तांतरित न करता आणखी 1 विचार येतो किती दिवस आपण असच वागून म्हशीच्या शेपिप्रमाने स्वतःवरच घान मारून स्वतः रडत बसणार आहोत🤔🤔           एक उत्तर नसलेला प्रश्न...!