बक्षीस आजच्याच दिवशी ची दहा वर्षां पूर्वीची गोष्ट, मी आठवीत होतो "आमदार शंकर धोंडी पाटील महाविद्यालय कंथेवाडी" शाळा नविन, मित्र, शिक्षक अन् सगळच नवीन.. काही जुन्या दोस्तांसोबत एका नवीन वातावरणात नवीन नियमांसोबत एक महिना भराचा आमचा प्रवास असेल... खूप नाव लौकिक ऐकुन या शाळेत घातले होते मामांनी... Pic. Prasad D ingavale त्या दिवशी भाषण स्पर्धा होती, विषय होता "राजर्षी शाहू महाराज".. मात्र तेंव्हा काहीच माहीत न्हवत.. मी राधानगरी चां रहिवासी आहे, मग राधानगरी हे नाव त्यांच्यामुळे "लक्ष्मी तलाव त्यांनी बांधले आहे आणि अस्वलाशी कुस्ती जिंकली होती एवढंच काही तर तोडका मोडका इतिहास माहिती... मग मी पुस्तके शोधायला सुरू केली.. आणि त्यांचा प्रवास समजून घेऊ लागलो ज्या गोष्टी आवडू लागल्या त्या कागदावर लिहून काढू लागलो.. अध्यक्ष महोदय आणि पूज्य गुरुजन वर्ग... पासून सुरावात केली भाषण लिहायला.. दोन दिवस सलग ते पाठ करत होतो... आमच्या शाळेच्या बाहे...