Posts

Showing posts from September, 2019

गावाकडची गोष्ट...भाग 1

Image
गावाकडची गोष्ट...          आमचं बालपण हुड्यात गेलं.. हुडा म्हणजे राधानगरी च्या खुशितल ४० ते ५० घर असणार गाव... आज देखील गावात गेलं की, सगळ बालपण डोळ्यासमोर उभा राहत, दिवस बदलेल तस गाव देखील बदललं, आणि गावा सोबत गावातील माणस देखील...         असो, पण माझ्या लहान पणीची माणसं, ते चेहरे, तो रस्ता आणि ते जून दत्ताच मंदिर, सावरीच झाड, लदित जायची वाट, मेड्यातील आंबे, कड्याखाली जाऊन झालेली काटवनातील करवांद, बैलकरांच्या परड्यातील आळूच झाड, तिरफळे आणि सगळ्या गावात प्रसिद्ध अशी ललांडी.. ( त्या perticular आंब्याला आम्ही ललांडी म्हणायचो)... सच्या भरणकर ने शेंड्याला चडून काडलेली रतांबी, त्याचा कोवळी पान, रामदास आडसुळ ची आज्जी नसताना चोरून नेलेली चटणी मीठ आणि कच्या करवंदाचां केलेला आंबट ठेचा.. त्यावर लाल भडक चटणी आणि थोडंसं मीठ.. जराशी मिळाली असली तर साखर... आणि पाणी...  आमचं विन्या हे करण्यात पठाईत.. आडसुळांच्य परड्यातील बरका फणस...  वड्याच्या पल्याड जाऊन चोरून आणलेला ऊस, संदीप गावडे बरं जाऊन काढलेल्या काजी आणि बोंडू, सावरीच्या झाडाची फुल.. आणि घानेरीच्या काटीला खोचका ठेऊन केलेली गा