Posts

Showing posts from March, 2019

गोष्ट पहिल्या प्रेमाची written by Abhijeet Bhatale Radhanagari

Image
गोष्ट प्रेमाची...            आठ  वर्षांपूर्वी ची गोष्ट. मी तेव्हां बारावीला होतो... नुकतंच नवीन कॉलेजात ॲडमिशन झालं होतं, किसनराव मोरे कॉलेज सरवडे...   कॉलेज खूप छान होतं पण तितकचं तिथं नियम आणि शिस्त यांचा बंधन खूप होत. पण, या नियम आणि शिस्त या बंधनातून मुक्त होऊन, जर कॉलेज विचार केला तर कॉलेज खूपच मस्त होत.       कधी वाटलं देखील नव्हतं की आपलं पहिलं प्रेम, पुन्हा नव्याने, याच कॉलेजमध्ये भेटेल आणि तेव्हा सातवीला असणाऱ्या माझ्या वर्गातील वर्गमैत्रीण,  'अंजली' पुन्हा कॉलेजमध्ये भेटली, पण पूर्ण बदलली होती. खव्याची बर्फी.. कच्चा मॅंगोची चॉकलेट किंवा चिंचेचा गोळा देऊन तिला इम्प्रेस करावे इतकी ती छोटी राहिली नव्हती. दोन वेण्या घालणारी, त्याला लाल रंगाची रिबीन बांधून तयार केलेलं, ते तिच्या वेनीच्या शेवटी असणार लाल फुल. मराठी शाळेचा तो निळा ड्रेस आणि पांढरा शर्ट असा असणार तिचा पेहराव. दोन्ही भुवयामध्ये अष्टगंधाची नाजूक टिकली जी तिच्या सौंदर्यात अधिकच भर पाडत होती. हातामध्ये हिरव्या बांगड्या... आणि डाव्या हाता मध्ये एक घड्याळ. पायामध्ये साजेस चप्पल कधी कधी सॅंडल, सतत